Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mhada Lottery 2023: पहिल्यांदाच म्हाडाची नोंदणी करत असाल, तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या लॉटरीची पहिल्यांदाच अर्ज करताना काही गोष्टी माहिती असायला हव्यात, अन्यथा अर्ज फेटाळला जातो.

Mhada Lottery 2023: तुम्हाला ही तुमच्या स्वप्नातील घर(Dream Home) खरेदी करायचं आहे तर, म्हडाने 16 ते 44 लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी लॉटरी काढली आहे. याकरिता तुम्हीही म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. तुम्ही एकदाच नोंदणी(Registration) करून अर्ज करू शकता. जर तुम्हाला याअगोदर म्हाडाच्या घराचा लाभ मिळाला आहे तर तुम्हाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. मात्र तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर https://www.mhada.gov.in या वेबसाईटला भेट द्या. पहिल्यांदाच म्हाडासाठी नोंदणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

अर्ज कसा करावा?

तुम्हाला नोंदणी करण्यासाठी Registration हा पर्याय निवडायचा आहे. तुम्ही तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती भरायची आहे. यासोबत आधार कार्ड नंबर(Aadhar Card Number) आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर देखील द्यावा लागणार आहे. हे सगळं भरल्यानंतर सबमिट करा. पुढे तुमच्या कामाचे डिटेल्स, पगार किंवा व्यावसायिक असाल तर त्याचे डिटेल्स भरून घ्या. तुम्ही जर कोट्यातून घर घेणार असाल तर त्याची माहिती आणि सोबत कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे.

अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी माहिती असायला हव्यात

सध्या सुरु असलेल्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 फेब्रुवारी आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज आणि पेमेंट करू शकता. याशिवाय अर्ज करणाऱ्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे आणि त्याच्या नावावर कोणतेही घर असू नये. याशिवाय 15 वर्षांपासून तो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात राहणारा रहिवासी असायला हवा.

या चुका करणं टाळा

  • तुमचं नाव, पत्ता आणि कामाची माहिती योग्य भरा, यामध्ये कुठेही तफावत आढळल्यास तुम्हाला घर मिळण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकते
  • नोंदणी(Registration) आणि पेमेंट रिसिट(Payment receipt) दोन्ही डाउनलोड करून मेलवरही ठेवा, चुकून हार्ड कॉपी कुठे गहाळ झाली तर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल
  • फाईल तयार करताना तीन फाईल तयार करा, एक बँकेसाठी, दुसरी म्हाडा ऑफिससाठी आणि तिसरी फाईल तुमच्याकडे बॅकअपसाठी असायला हवी
  • ऑरिजनल डॉक्युमेंट आणि त्यासोबत झेरॉक्सचीही ट्रू कॉपी किंवा सेल्फ अटेस्टेड करून घ्या
  • कागदपत्रातील माहिती आणि तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये साम्य असायला हवे, नाहीतर तुमचं नाव लॉटरीतून बाद केलं जाऊ शकतं