यावेळी म्हाडानं आवेदन प्रक्रिया सोपी ठेवली असून, तुम्ही एकाच नोंदणीतून म्हाडाच्या कोणत्याही मंडळातील घरासाठी (dream home) अर्ज करू शकता. म्हाडाने आगोदरच झैर केल्याप्रमाणे सोडतीच्या आधीच कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराला करायची आहे आणि त्याची छाननी देखील अगोदरच केली जाणार आहे. तेव्हा फॉर्म भरताना कुठलीही चूक व्हायला नको हे लक्षात ठेवा.
म्हाडा सोडतीसाठी नवी उत्पन्नमर्यादा निर्धारित केली गेली आहे, ती खालीलप्रमाणे (MHADA lottery income belt).
काय आहे नवा उत्पन्नगट?
2022 मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार (वार्षिक) उत्पन्नाची अट.
- अत्यल्प गट - वार्षिक 6 लाख रुपये (प्रति महिना 50 हजार रुपये)
- अल्प गट - वार्षिक 6 लाख 1 रुपये ते 9 लाख 1 रुपये
- मध्यम गट - वार्षिक 9 लाख 1 रुपये ते 12 लाख 1 रुपये
- उच्च गट- वार्षिक 12 लाख 1 रुपये ते 18 लाख 1 रुपये
म्हाडाकडून देण्यात आलेली उत्पन्नमर्यादा (MHADA Mumbai Homes) मुंबई महानगर, पुणे (MHADA Pune) महानगर प्रदेश, आणि 10 लाखांहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लागू असेल.
याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील सोडतींसाठी उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे:
- अत्यल्प गट - वार्षिक 4 लाख 50 हजार रुपये
- अल्प गट - वार्षिक 4,50,001 रुपये ते 7 लाख 50 हजार रुपये
- मध्यम गट - वार्षिक 7,50,001 रुपये ते 12,00,000 रुपये
- उच्च गट - वार्षिक 12,00,001 रुपये ते 18,00,000 रुपये
घराचा ताबा लवकर मिळणार
म्हाडाच्या घरासाठी अर्जनोंदणी करतानाच सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. त्याची छाननी देखील अगोदरच केली जाणार असल्याने सोडतीनंतर ताबा मिळवण्यासाठी लागणारी दिरंगाई टळणार आहे. सोडतीआधी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा आणि निवासाचा दाखलाही सादर करणं अपेक्षित असेल.