Job Opportunities: सध्या मोठमोठ्या कंपन्या नोकर कपात करत आहेत. त्यामुळे बरेचजण सध्या चांगल्या नोकरीच्या(Job) शोधात आहेत. सरकारी नोकरी(Government Job) मिळावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावामुळे ही संधी हुकते. त्यामुळेच 'Mahamoney'ने पुढाकार घेत, सरकारी नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेल्या किंवा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीसाठी सहज व सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल. बँक ऑफ महाराष्ट्र(BOM) आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये(MPT) विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पात्रतेचे निकष काय, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्र(Bank of Maharashtra)
पद - अप्रेंटिस(Apprentice)
शैक्षणिक पात्रता - पदवीधर(Graduate)
एकूण पद संख्या - 314
वयोमर्यादा - 20 ते 28 वर्ष
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 डिसेंबर 2022
संकेतस्थळ - www.bankofmaharashtra.in
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावरूनच उमेदवार ऑनलाईन पद्धतीने(Online) अर्ज करू शकतात.
मुंबई पोर्ट ट्रस्ट(Mumbai Port Trust)
पद - कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट (COPA)
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI
एकूण पद संख्या - 50
पद - पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल)(Graduate Apprentice (Mechanical)
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
एकूण पद संख्या - 2
पद - पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)(Graduate Apprentice (Electrical)
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
एकूण पद संख्या - 3
पद - टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)(Technician Apprentice (Mechanical)
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण पद संख्या - 3
पद - टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)(Technician Apprentice (Electrical)
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण पद संख्या - 3
नोकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 जानेवारी 2023
संकेतस्थळ www.mumbaiport.gov.in
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती निघाली आहे. ऑनलाईन(Online) आणि ऑफलाईन(Offline) अशा दोन्ही पद्धतीने इच्छुक उमेदवार याकरिता अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - ATC, भंडार भवन, तिसरा मजला, एन.व्ही. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई - 400010
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.mumbaiport.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर Media मध्ये Vacancy वर क्लिक करा. Advertisement वर क्लिक करा. तुम्हाला या संदर्भातील जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. यामध्ये सविस्तर माहिती मिळेल.