Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Restrictions on SBM Bank: 'या' बँकेच्या व्यवहारांवर RBI ने घातले निर्बंध

RBI Bank

Image Source : www.commons.wikimedia.org

RBI Restrictions on SBM Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रिझर्व्ह बँकेने एसबीएम(SBM) बँक इंडिया लिमिटेडवर लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ घेतला आहे.

RBI Restrictions on SBM Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तुम्हीही देशातील कोणत्याही बँकेत खाते उघडले असेल तर RBI चे नवीन नियम नक्की माहिती करून घ्या. रिझर्व्ह बँकेने आता SBM बँकेच्या व्यवहारांवर तात्काळ बंदी घातली आहे, याचा अर्थ तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यवहार आता करू शकणार नाही. चला यासंदर्भात जाणून घेऊयात.

LRS अंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय 

रिझर्व्ह बँकेने(RBI) एसबीएम बँक इंडिया लिमिटेडवर(SBM Bank India Limited) लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (Liberalized Remittance Scheme) अंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ घेतला आहे. काही आर्थिक समस्यांमुळे ही बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने(RBI) म्हटले आहे की, पुढील सूचनेपर्यंत ही बंदी लागू होणार आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A आणि 36(1)(A) अंतर्गत, रिझर्व्ह बँकेने SBM बँकेला LRS व्यवहार थांबवण्याचे निर्देश दिले असून, ज्याचे बँकेने पालन करणे गरजेचे आहे. यासंदर्भात आरबीआयने एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे.

3 कोटींचा आकारला होता दंड

SBM बँक ही मॉरिशसस्थित SBM होल्डिंगची उपकंपनी असून हा एक वित्तीय सेवा समूह आहे.  जो ठेवी, कर्ज, व्यवसायासाठी वित्तपुरवठा आणि कार्ड्स यासह इतर अनेक सेवा देतो. SBM बँकेने RBI कडून परवाना घेऊन त्यानंतर 1 डिसेंबर 2018 रोजी बँकिंग सुविधा सुरू केल्या होत्या. सध्या देशभरात त्यांच्या एकूण 11 शाखा असून 2019 मध्ये नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल बँकेला 3 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता.