Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Repo Rate Hike: बॅंक निफ्टी 984 तर सेन्सेक्सची 1016 अंकांनी भरारी!

Sensex Rise by 1000 point

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली.

इंडियन स्टॉक मार्केटमध्ये (Indian Stock Market) गेल्या 6 दिवसांपासून सतत घसरण सुरू होती. सेन्सेक्सने या घसरणीला आज ब्रेक देत 1016 अंकांनी भरारी घेतली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ (Repo Rate Increased by 50 bps point) केल्यानंतर सेन्सेक्सवर कोणताही नकारात्मक पवित्रा दिसून आला नाही. उलट सेन्सेक्सने या निर्णयाचे स्वागत करत 1 हजार अंकांची भरारी मारली. बॅंक निफ्टीमध्येही 984 अंकांनी वाढ झाली. थोडक्यात आरबीआयच्या या निर्णयाचे बॅंकांकडून स्वागत झाल्याचे दिसून येते.

आज सकाळी 10 वाजता RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये तेजीचे वातावरण होते. ही तेजी संपूर्ण दिवसभर टिकून होती. दुपारी पावणे तीनच्या सुमारास सेन्सेक्स 1156 अंकांनी वाढला होता. तर NSE 50 मध्ये 308 अंकांनी वाढ झाली होती. शेवटी मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1016 अंकांवर, बॅंक निफ्टी 984 तर निफ्टी फिफ्टी 276 अंकावर बंद झाला.

Sensex Rise on 30 Sep. 2022
Image Source : Google.com    

शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, मार्केटला आरबीआयच्या निर्णयाची कल्पना होती. आरबीआय रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करणार याची गुंतवणूकदारांना कल्पना होती. कारण जगभरातील सेंट्रल बॅंकांनी महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे RBI सुद्धा असाच निर्णय घेईल याचा मार्केटमधील गुंतवणूकदारांना अंदाज होता.

आरबीआयने सध्याच्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचे अंदाज कमी केले आहेत. पण पुढील वर्षाच्या जीडीपी वाढीचे अंदाज मात्र वाढवले आहेत. 2023-23 मध्ये जीडीपीचा ग्रोथ रेट 7.2 टक्के असेल, असा अंदाज दास यांनी व्यक्त केला. हा अंदाज यापूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2023-24 या वर्षाचा जीडीपी ग्रोथ रेट 6.7 टक्के असेल, असे सांगितले होते. अमेरिका आणि युरोपमधील देशांची अर्थव्यवस्था मंदावली आहे. अमेरिकेच्या जीडीपीमध्ये सतत घसरण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा 7 टक्क्यांचा ग्रोथ रेट हा दिलासादायक आहे.

महागाई आटोक्यात येण्याची शक्यता!

रेपो दरात वाढ केल्यामुळे पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाई दर 6 टक्क्यांपर्यंत येईल, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला. 6 टक्के महागाई दर हा आरबीआयने आखून दिलेली मर्यादा आहे. जर ही मर्यादा किंवा हा महागाई दर तंतोतंत पाळला गेला तर आरबीआयला पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची गरज पडणार नसल्याचे दिसून येते.