सध्या संपूर्ण भारत आझादी का अमृतमहोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav), भारताचे 75 वे स्वातंत्र्य वर्ष साजरा करण्याच्या मूडमध्ये आहे. या स्वातंत्र्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला ‘आर्थिक स्वातंत्र्य’ (Financial Freedom) मिळवून देणारी भेटवस्तू देऊ शकता. बहिणीला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारा रक्षाबंधनाशिवाय दुसरा कोणता चांगला दिवस असू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या बहिणीला फायनान्शिअल फ्रीडम मिळवून देणाऱ्या प्रोडक्टसची माहिती घेऊन आलो आहोत.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधल्यानंतर भाऊ तिला काही ना काही तरी भेटवस्तू देतो. ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. सध्याच्या काळात रोख पैशांसोबत कपडे, गिफ्ट व्हाऊचर्स ते विविध प्रकारची गॅझेट्स देण्याचा ट्रेण्ड आहे आणि या गिफ्ट देण्याच्या यादीला सीमा नाही. बहिणींकडे अशा पद्धतीने गिफ्ट स्वीकारण्याची भलीमोठी यादी असते. पण अशा वस्तुंऐवजी बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि भविष्यात तिला अधिक मोबदला मिळवून देणारी भेटवस्तू देता येऊ शकेल.
इथे आम्ही तुमच्यासाठी रक्षाबंधनानिमित्त अशी काही फायनान्शिअल प्रोडक्ट्सची माहिती घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बहिणीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी भेटवस्तू देऊ शकता. (Raksha Bandhan 2022)
मुदत ठेवी (Fixed Deposit-FD)
परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी किंवा परदेशात फिरण्यासाठी एक मोठी रक्कम उभी करण्याच्या दृष्टीने तुम्ही बहिणीच्या नावे बॅंकेत मुदत ठेवी (Fixed Deposit) ठेवू शकता.
म्युच्युअल फंड (Mutual Fund)
एसआयपी (SIP) किंवा एकरकमी (Lum sum Amount) रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवून बहिणीला मोठं गिफ्ट देता येऊ शकतं.
आरोग्य विमा (Health Insurance plan)
अनपेक्षितपणे उद्वभवणाऱ्या आजारांपासून बहिणीचं रक्षण करण्यासाठी तुम्ही तिची विमा पॉलिसी काढून त्याचा प्रीमियम भरू शकता.
डिजिटल सोनं (Digital Gold)
प्रत्यक्ष सोन्याची वस्तू किंवा एखादा दागिना भेट देण्याऐवजी तुम्ही डिजिटल किंवा पेपर गोल्ड बहिणीला गिफ्ट करू शकता.
शेअर्स (Stocks)
चांगल्या कंपनीचे शेअर्स भेट म्हणून देणं, हा भेटवस्तू देण्याचा एक चांगला पर्याय असू शकतो. दीर्घकालीन मुदतीचा विचार करून तुम्ही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स नक्कीच भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
आर्थिक साक्षरता आणि चांगली क्रेडिट हिस्ट्री हा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आधारस्तंभ ठरू शकतो. त्यामुळे या रक्षाबंधनला तुम्ही तुमच्या बहिणीला आर्थिक साक्षर करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकता.