• 02 Oct, 2022 09:44

Fixed Deposit वर या पाच बँका देतात सर्वाधिक व्याज

Fixed Deposit वर या पाच बँका देतात सर्वाधिक व्याज

'आरबीआय'ने शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी रेपो दर वाढवला तर बँकांकडून कर्जदरात वाढ केली जाईल. त्याचबरोबर ठेवीदर देखील वाढण्याची शक्यता आहे. मागील महिनाभरात बँकांनी ठेवीदर वाढवून तो आकर्षक केला आहे. ठेवींचे दर वाढल्याने ठेवीदारांना फायदा होणार आहे.

रिझर्व्ह बँक शुक्रवारी 5 ऑगस्ट 2022 रोजी पतधोरण जाहीर करेल. यात बँकेकडून रेपो दर वाढवला जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनं मे महिन्यात रेपो दरात अनपेक्षितपणे 0.40% वाढ केली होती. त्यापाठोपाठ जूनमध्ये बँकेने रेपो दर (Repo Rate) 0.50% वाढवला होता. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर सर्वच प्रकारची कर्जे महागली. तसेच (Fixed Deposit Rate Rise) ठेवीदर देखील वाढला होता. रेपो दरवाढ कर्जदारांसाठी डोकेदुखी वाढवणारी असली तरी ठेवीदारांसाठी सुखद ठरेल.

व्याजदर वाढीच्या चक्रामुळे अल्प मुदतीच्या ठेवी आकर्षक बनल्या आहेत. 1 ते 2 वर्षासाठी पाच बँका चांगला परतावा देत आहेत. या बँका फिक्स्ड डिपॉझिटवर 5.75% ते 6.75% या दरम्यान व्याज देत आहेत.

ठेवींमधील गुंतवणूक ही फिक्स्ड इन्कम प्रकारातील जोखीम मुक्त गुंतवणूक आहे. फिक्स्ड डिपॉझिटचा सध्याचा व्याजदर हा ट्रेझरी बिल किंवा सरकारी रोख्यांच्या तुलनेत जास्त आहे. फिक्स्ड डिपॉझिट हे 7 दिवसांपासून ते 10 वर्ष या कालावधीसाठी करता येऊ शकते. त्याशिवाय फिक्स्ड डिपॉझिटवर गरज पडल्यास कर्ज घेता येते. कर बचतीच्या दृष्टीने फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली जाते. पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनांमधील गुंतवणूक ही आयकर कलम 80 सी नुसार कर वजावटीसाठी पात्र ठरते.

फिक्स्ड डिपॉझिटचा व्याजदर

बँक

वर्ष

वर्ष

आरबीएल बँक

6.5%

6.75%

डीसीबी बँक

6.1%

6.6%

बंधन बँक

6.25%

6.5%

आयडीएफसी बँक

5.75%

6.5%

इंड्सइंड बँक

6%

6.5%