Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Radiant IPO : रेडिअंट कंपनीच्या आयपीओचा शेअर बाजारात सिक्सर      

Radiant IPO

Radiant IPO : रेडिअंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचा शेअरची आज बाजारात नोंदणी झाली. आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळ जवळ 6% परतावाही मिळाला. ही कंपनी नेमकी कुठली आहे, आयपीओ का यशस्वी झाला जाणून घेऊया

रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस (Radiant Cash Management Services) या कंपनीचं शेअर बाजारातलं (Stock Market) पदार्पण आज लक्षवेधी ठरलं. बाँबे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) या शेअरची नोंदणी झाली. आणि नोंदणी किंमत 94 रुपये असताना बाजार उघडतानाच शेअरने षटकार मारून एंट्री घेतली. म्हणजे 99 रुपयांवर शेअर उघडला. त्यानंतर दिवस संपताना त्याची किंमत 104 रुपयांवर पोहोचली होती.    

आज शेअर बाजार उघडण्यापूर्वी ग्रे मार्केट प्रिमिअममध्ये हा शेअर खाली होता. शिवाय आयपीओसाठी नोंदणीही फक्त 53% झाली होती. त्यामुळे आयपीओकडून तज्ज्ञांना आज फारशी अपेक्षा नव्हती. पण, शेअर बाजार उघडल्यावर शेअरने उसळी घेतली. महत्त्वाचं म्हणजे एरवी दोन्ही निर्देशांक कोसळले असताना या शेअरने मात्र 11% परतावा पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला आहे. रेडियंट कंपनीचा आयपीओ 23 ते 27 दरम्यान नोंदणीसाठी उपलब्ध होता.   

radiant.png
स्त्रोत - NSE लाईव्ह

या आयपीओचा एकूण आकार 250.76 कोटी रुपयांचा होता. आणि यात 51.27 मूल्याचे शेअर तर 199.5 मूल्याची OFS ऑर्डर असं त्याचं स्वरुप होतं.    

रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली आहे. आणि बँका, वित्तीय संस्था यांना रोखता व्यवस्थापनासाठी ही कंपनी मदत करते. याशिवाय रिटेल आणि ई-कॉमर्स कंपन्यांनाही ती सेवा पुरवते. ICICI, HDFC, सिटी बँक, कोटक महिंद्रा बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया असे ग्राहक या संस्थेनं जोडले आहेत.    

शेअर बाजारात नोंदणी झाली तेव्हा शेअरची किंमत 94-99 रुपयांच्या दरम्यान निर्धारित करण्यात आली होती. आणि आयपीओला मिळालेल्या कमी मागणीमुळे नोंदणीची किंमतही 94 रुपये म्हणजे खालच्या स्तरावर निश्चित झाली. कॅश व्यवस्थापनाची सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत ही निर्धारित किंमत जाणकारांना खूप जास्त वाटत होती. त्यामुळे अनेक संस्थांनी रेडियंटला एकच स्टार दिला होता.