Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Recap 2022-IPO: नावाजलेले IPO आपटले आणि नवख्या कंपन्यांनी दिले छप्परफाड रिटर्न्स

Recap 2022 Best and Worst IPO

Recap 2022-IPO: वर्ष 2022 'आयपीओ'च्या दृष्टीने निराशाजनक केले. वर्षभरात एलआयसीसारख्या बड्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची सपशेल निराशा केली तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करुन गेले.

वर्ष 2022  'आयपीओ'च्या दृष्टीने निराशाजनक केले. वर्षभरात एलआयसीसारख्या बड्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची सपशेल निराशा केली तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करुन गेले. वर्ष 2022 मध्ये 16 डिसेंबर 2022 पर्यंत 36 कंपन्यांनी IPO मधून जवळपास 57000 कोटींचे भांडवल उभारले. वर्ष 2021 च्या तुलनेत यंदाची निधी उभारणी निम्म्याने कमी झाली. 2021 मध्ये 63 कंपन्यांनी आयपीओमधून 1.21 लाख कोटींचे भांडवल उभारले होते.

कोरोनातून अर्थव्यवस्था सावरल्याने 2022 च्या सुरुवातीला अनेक कंपन्यांनी IPO चे प्लॅन जाहीर केले होते. मात्र फेब्रुवारीत रशिया आणि युक्रेन युद्धाला प्रारंभ झाला आणि शेअर मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. भारतासह प्रमुख देशांतील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. शेअर मार्केटमधील वातावरण बिघडल्याने अनेक कंपन्यांनी आयपीओचे नियोजन गुंडाळाले. काहींनी अनिश्चित काळासाठी ते पुढे ढकलले. यामुळे वर्ष 2022 मधील आयपीओ योजनांची संख्या घटल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओला पुढे ढकलले होते. मात्र त्यानंतरही एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांच्या दृष्टीने वेदनादायी ठरला. त्याशिवाय डिल्हीवरी, एजीएस ट्रॅन्सॅक्ट या आयपीओ योजना गुंतवणूकादारांचे जवळपास 25% नुकसान करुन गेल्या.

एका बाजुला बाजारात दाखल होणाऱ्या बड्या बड्या आयपीओ योजना फ्लॉप ठरल्या तर काही कंपन्यांच्या आयपीओंनी गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले. अदानी विल्मर या अदानी समूहातील सातव्या कंपनीने गुंतवणूदारांचा जबरदस्त फायदा दिला. अदानी विल्मर आणि व्हिनस पाईप्स अॅंड ट्युब्ज या कंपन्यांचे आयपीओ 100 ते 150% नी वधारले. वर्ष 2022 मध्ये आयपीओंचे सरासरी आकारमान 1844 कोटी इतके खाली आले.

debit-credit-2022-4.png

वर्ष 2022 मध्ये हे आयपीओ ठरले बेस्ट

अदानी विल्मरच्या आयपीओमधून गुंतवणूकदारांनी 128% नफा कमावला. अदानी विल्मरचा शेअर शुक्रवारी 617.45 रुपयांवर बंद झाला. हा शेअर वर्ष 2022 मधील मल्टीबॅगर ठरला. हरिओम पाईप्स या कंपनीच्या आयपीओमधून गुंतवणूकदारांनी 116% नफा कमाई केली. हरिओम पाईप्सचा आयपीओ जानेवारी 2022 मध्ये शेअर बाजारात धडकला होता. शुक्रवारी हरिओम पाईप्सचा शेअर 358.50  रुपयांवर बंद झाला. व्हिनस पाईप्स अॅंड ट्युब्ज 115%, वरांडा लर्निंग सोल्युशन्स 76%, वेदांत फॅशन्स 51% यासारख्या आयपीओ योजना गुंतवणूकदारांसाठी बेस्ट ठरल्या.

LIC IPO ठरला गुंतवणूकदारांसाठी वेदनादायी

भारतातील सर्वात मोठा आयपीओ असा विक्रम करणाऱ्या एलआयसीने वर्ष 2022 मध्ये शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला.  एलआयसीमधील 3.5%  हिस्सा विक्री करुन केंद्र सरकारने 21500 कोटी उभारले. मात्र IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांची घोर निराशा झाला. सरकारने एलआयसीचा आयपीओ यशस्वी व्हावा यासाठी मोठा प्रचार प्रसार केला होता. या समभाग विक्री योजनेत एलआयसी पॉलिसीधारकांना देखील राखीव हिस्सा ठेवण्यात आला होता. मात्र एलआयसीची शेअर बाजारात निराशाजनक सुरुवात झाली. IPO मधील इश्यू प्राईसच्या तुलनेत 9% कमी दराने एलआयसीचा शेअर सूचीबद्ध झाला. त्यानंतर तो सावरलाच नाही. नोंदणीनंतर पाच महिन्यात एलआयसीने 588 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. यात एलआयसीचे बाजार भांडवल तब्बल 2.1 लाख कोटींनी कमी झाले. वर्ष 2022 मध्ये एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 28% नुकसान सोसावे लागले.

कंपन्यांचे नाव मोठे पण IPO ठरले फ्लॉप

वर्ष 2022 मध्ये फ्लॉप ठरलेल्या आयपीओंच्या यादीत एलआयसीचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय एजीएस ट्रॅन्सॅक्ट टेक्नॉलॉजीच्या आयपीओने वर्ष 2022 मध्ये 63% नुकसान केले. डिल्हीवरीचा आयपीओ 33% ने घसरला. आयनॉक्स ग्रीन एनर्जी 31%, एलआयसी 28%, अबन होल्डिंग्जच्या आयपीओने गुंतवणूकदारांचे 25% नुकसान केले.