PNB Bank KYC Last Date: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, पंजाब नॅशनल बॅंकेने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना केवासी (Know Your Customer-KYC) अपडेट करण्याचे आवाहन केले. पंजाब नॅशनल बॅंकेच्या ग्राहकांनी 12 डिसेंबर, 2022 पर्यंत ही माहिती अपडेट करणे अपेक्षित आहे. (PNB Bank KYC last Date)
ज्या ग्राहकांनी अजून केवासी अपडेट केलेले नाही. अशा ग्राहकांना बॅंकेने मोबाईल एसएमएस, ईमेल नोटीफिकेशन्स आणि नोंदणीकृत पत्त्यावर नोटीस पाठवून लवकरात लवकर केवासी अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या सोशल मिडिया हॅण्डलवर 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी याबाबतची माहिती पोस्ट केली. तसेच न्यूजपेपरद्वारेही ग्राहकांना याबाबतची माहिती बॅंकेने दिली.
बॅंकेने न्यूजपेपरद्वारे पब्लिश केलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, ‘रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, बॅंकेच्या सर्व ग्राहकांना केवासी (KYC) अपडेट करणे बंधनकारक आहे. ज्या ग्राहकांचे खाते केवायसी अपडेट नाही. अशा ग्राहकांना यापूर्वीच त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एसएसएस पाठवून कळवण्यात आले आहे. त्यामुळे अशा ग्राहकांनी लवकरात लवकर जवळच्या शाखेशी संपर्क साधून 12 डिसेंबरपूर्वी केवासी अपडेट करून घ्या. जे ग्राहक खाते केवायसी अपडेट करणार नाहीत. त्या ग्राहकांना 12 डिसेंबरनंतर आपले बॅंक खाते वापरता येणार नाही.”
केवायसी अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे!
पंजाब नॅशनल बॅंकेच्या ग्राहकांना खाते अपडेट करण्यासाठी फोटो ओळखपत्र (Photo Identity), पत्त्याचा पुरावा (Address Proof), लेटेस्ट फोटो (Latest Photographs), पॅनकार्ड (Pancard), उत्पन्नाचा पुरावा (Proof of Income) आणि मोबाईल क्रमांक (Mobile Number) आदी माहिती विचारली जात आहे. या माहितीशी संबंधित कागदपत्रे बॅंकेत जमा करून ग्राहकांना केवायसी अपडेट (PNB Bank KYC Documents) करता येईल.
केवायसी अपडेट आहे की नाही कसे कळेल?
पंजाब बॅंकेने केवायसी अपडेट करण्याच्या आवाहनाला एका ग्राहकाने ट्विटरद्वारे विचारणा केली होती की, आमचे खाते केवायसी अपडेट आहे की नाही, हे कसे कळू शकेल. यावर बॅंकेने टोल फ्री क्रमांक (1800 180 2222 / 1800 103 2222 किंवा 0120-2490000) दिले आहेत. या क्रमांकाद्वारे ग्राहक बॅंकेला आपला खाते क्रमांक सांगून केवायसी अपडेट आहे की नाही, याची माहिती मिळवू शकतात. तसेच ज्या ग्राहकांना खात्यातील शिल्लक रकमेबाबतची माहिती हवी असेल ते ग्राहक, 1800 180 2223 किंवा 0120-2303090 या क्रमांकावर विचारणा करू शकतात.