Philips Layoff: डच वैद्यकीय तंत्रज्ञान निर्माता फिलिप्सने(Philips) सोमवारी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने सोमवारी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनी जगभरातील एकूण कर्मचार्यांपैकी 6,000 कर्मचार्यांची नोकरकपात करणार आहे. आर्थिक मंदीचा सर्वात मोठा फटका फिलिप्स कंपनीला सुद्धा बसला आहे.
3 महिन्यांपूर्वी केली होती 4000 कर्मचाऱ्यांची कपात
डच वैद्यकीय तंत्रज्ञान निर्माता फिलिप्सने(Philips) सोमवारी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनीला झालेल्या नुकसानीमुळे जगभरातील 6,000 नोकऱ्या कमी होणार असल्याचे खुद्द कंपनीने सांगितले आहे. कंपनीने जवळपास तीन महिन्यांपूर्वी 4,000 नोकरकपातीची घोषणा केली होती, त्यानंतर कंपनीकडून ही दुसरी सर्वात मोठी नोकरकपातीची घोषणा करण्यात आली आहे. कंपनी 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ रॉय जेकब्स(CEO Roy Jacobs) यांनी दिली आहे.
सीईओ जेकब्स(Roy Jacobs) यांनी काय म्हटलं आहे?
कंपनीचे सीईओ जेकब्स(CEO Roy Jacobs) यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "फिलिप्स आणि आमच्या भागधारकांसाठी 2022 हे वर्ष अतिशय कठीण होत. कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी आणि कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक निर्णय घेणे आमच्यासाठी गरजेचे झाले आहे. अॅमस्टरडॅम-आधारित फर्मने 2022 च्या चौथ्या तिमाहीत 105 दशलक्ष युरो आणि मागील वर्षासाठी 1.6 अब्ज युरोचा निव्वळ तोटाच नोंदवला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रिकॉल करावे लागणार आहे. फिलिप्सने 2021 मध्ये स्लीप एपनियाने ग्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या डिव्हाइसेसना मोठ्या प्रमाणावर परत मागवण्याची घोषणा केली असल्याचेही ते म्हणाले.