US companies laying off employees: गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, मेटा, अल्फाबेट आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांमधील कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेतील हजारो भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, या व्यक्ती त्यांच्या वर्क व्हिसाच्या अंतर्गत देशात राहण्यासाठी आणि विहित कालावधीत नवीन नोकऱ्या शोधण्यासाठी संघर्ष करत आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या मते, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून जवळपास 2 लाख आयटी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, ज्यात साधारण 90 हजार व्यक्ती या भारतीय आहेत.
40 टक्के भारतीय एच-1 बी व्हिसावर (40% of Indians are on H-1B visas)
पीटीआयच्या अहवालात म्हटले आहे की त्यापैकी 30 ते 40 टक्के भारतीय आयटी व्यावसायिक आहेत, जे मोठ्या प्रमाणात एच-1 बी ( H-1B) आणि एल-1 (L1) व्हिसावर आहेत. एच-1 बी व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे जो यूएस कंपन्यांना परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी देतो.
टेक कंपन्या भारत आणि चीन सारख्या देशांमधून दरवर्षी हजारो कर्मचारी नियुक्त करण्यासाठी त्यावर अवलंबून असतात. एल- अ आणि एल- ब (L-1A & L-1B) व्हिसा तात्पुरत्या इंट्राकंपनी बदल्यांसाठी उपलब्ध आहेत जे व्यवस्थापकीय पदांवर काम करतात किंवा त्यांना विशेष ज्ञान आहे. मोठ्या संख्येने भारतीय आयटी व्यावसायिक जे एच-1 बी ( H-1B) आणि एल-1 (L1) सारख्या बिगर इमिग्रंट वर्क व्हिसावर आहेत.
अहवालानुसार, हे लोक आता अमेरिकेत राहण्याचे पर्याय शोधत आहेत जेणेकरून त्यांना काही महिन्यांच्या कालावधीत नवीन नोकरी मिळू शकेल. अहवालात असे म्हटले आहे की एच- ब व्हिसा धारकांसाठी परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे कारण त्यांना 60 दिवसांच्या आत नवीन नोकरी शोधावी लागेल अन्यथा त्यांच्याकडे भारतात परत जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
अमेरिकेची स्थिती भारतापेक्षाही वाईट (The condition of America is worse than India)
अॅमेझॉन, गुगल या कंपन्यांना दिग्ग्ज म्हटले जाते कारण त्यांच्याकडे इतका कॅश फ्लो आहे की ते एखादा देश चालवू शकतात. मात्र असे असले तरी कोव्हिड काळात मागणी वाढल्यामुळे केलेली अव्वाच्या सव्वा भरती, जी आता ते कपात करत आहेत. मात्र यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांना अपेक्षित असलेला बिझनेस वाढलेला नाही, त्यामुळे ही कपात होत आहे, तसेच गुगलमध्ये कपात झाली तेव्हा सुंदर पिचाई यांनी म्हटले होते, 2023 च्या स्ट्रॉम अर्थात वादळासाठी तयार राहा, म्हणजे काय? हे वर्ष आयटी क्षेत्रासाठी घातक असणार आहे का? आता आयटी कंपन्यांना झेप घेण्यासाठी नवी पावले उचलण्याची गरज आहे, असेही त्यांच्या भाषणात सूचकपणे म्हटले होते. सध्या आयटी व्यतिरीक्त इलेक्ट्रॉनिक, केमिकल. इन्फ्रास्ट्रॅक्चर, डिजिटल आदी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी आताच्या तरुण मंडळींनी तयार राहायला पाहिजे. एकाच सेक्टरला चिकटून राहण्याचा जमाना गेला आता तुम्हाला विविध क्षेत्रात तुमची जागा, तुमच्या योग्य काम पाहावे लागणार आहे, त्यासाठी स्किल्स डेव्हप्ल करावे लागणार आहेत, मगच आत्ताच्या मंदीच्या काळात टिकता येणार आहे. सध्या अमेरिकेत भारतात होणाऱ्या महागाईच्या साधारण दहा पटीने महागाई वाढली आहे, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होत आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील भारतीयांना तग धरून ठेवणे कठीण होत आहे, फॉरेन ट्रेड एक्स्पर्ट आशिष साठे यांनी सांगितले.