Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Agent: महारेराची परीक्षा पास झाल्यानंतरच बनता येईल अधिकृत रिअल इस्टेट एजंट!

Real Estate

Real Estate Agent: रिअल इस्टेट एजंट हा मालमत्तेचा विक्रेता आणि खरेदीदाराच्या मधील दुवा असून यापुढे एजंटला महारेराची परीक्षा पास होऊनच अधिकृत एजंट बनता येणार आहे.

Real Estate Agent: रिअल इस्टेट एजंट हे राज्यातील मालमत्ता खरेदीदार आणि मालमत्तेचे मालक यांच्यातील मध्यस्थ किंवा दुवा म्हणून ओळखले जातात. महारेराने(MahaRERA) रिअल इस्टेट एजंट करिता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे रिअल इस्टेट एजंटला परीक्षा उत्तीर्ण होऊनच अधिकृतपणे एजंट म्हणून काम करता येणार आहे. चला तर यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ.

कधीपासून होईल अंमलबजावणी?

कोणालाही यापुढे रिअल इस्टेट एजंट(Real Estate Agent) बनता येणार नाही. रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी यापुढे महारेराची(RERA) परीक्षा पास व्हावी लागणार आहे. ही परीक्षा पास झाल्यावरच व्यवसायाचा परवाना एजंटला दिला जाईल असा निर्णय महारेराने घेतला आहे. 1 मे 2023 पासून महारेराच्या या नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सध्या 37,746 प्रॉपर्टी एजंट(Property Agent) असून या प्रॉपर्टी एजंटसाठी परीक्षा(Exam) देणे यापुढे बंधनकारक असणार आहे. महारेराने रिअल इस्टेट एजंटसाठी प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली असून एका परिपत्रकाच्या माध्यमातून या योजनेची माहिती देण्यात आली आहे. रेराचा नियम(MahaRERA Rule) लागू झाल्यानंतर प्राधिकरण केवळ वैध योग्यता प्रमाणपत्र असलेल्या एजंटनाच पोर्टलवर अधिकृत रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी(Registration) करण्याची परवानगी देणार आहे.

रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे!

महारेराने त्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे की, रिअल इस्टेट एजंट हे प्रवर्तक आणि घर खरेदीदार यांच्यातील मध्यस्थ असल्याने त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
रिअल इस्टेट एजंट्सच्या कामामध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगतता आणण्यासाठी, नियामक आणि कायदेशीर फ्रेमवर्क पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी, आचारसंहितेची अंमलबजावणी आणि रिअल इस्टेट एजंट व्यावसायिकदृष्ट्या पात्र आहेत याची खात्री करण्यासाठी महारेराने(MahaRERA) संपूर्ण महाराष्ट्रात रिअल इस्टेट एजंटसाठी मूलभूत रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे. प्राधिकरणाकडून गेल्या 2 वर्षांमध्ये एजंट प्रशिक्षणासाठी मूलभूत अभ्यासक्रम विकसित केला आहे. त्यानुसार येत्या फेब्रुवारी महिन्यापासून पॅनेल केलेले प्रशिक्षण प्रदाते ऑनलाईन, ऑफलाईन आणि हायब्रिड स्वरूपात प्रशिक्षण देण्यात येईल. ही परीक्षा उर्तीर्ण झाल्यानंतरच अधिकृतपणे एजंट म्हणून काम करता येणार आहे.