MahaRERA: महारेराकडे नोंदणी करताना सर्व गृहनिर्माण प्रकल्प व्यवस्थापकांना स्वतःसह प्रकल्पाशी इतर संबंधित असलेले संचालक, पदनामनिर्देशित भागीदार, प्रकल्पाशी संबंधित इतर प्रकल्पांचे भागीदार, मर्यादित दायित्व भागीदार, प्रवर्तकाच्या संस्थेचे भागीदार, प्रकल्पाशी संबंधित कुठल्याही संस्थेचे मालक या सर्वांची दिनक्रमांकासोबत देशातील कुठल्याही रेराकडे(MahaRERA) नोंदणीकृत केलेल्या प्रकल्पांची सर्व माहिती आता द्यावी लागणार आहे. जर ही माहिती देण्याचे टाळले तर त्या प्रकल्पाची महारेराकडे नोंदणीच(Registration) होणार नाही. जर नोंदणी करण्यात आली तर ग्राहकांना याबाबतची माहिती सहज मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहक वेळीच सावध होतील व घर घेताना त्याची फसवणूक होणार नाही.
स्व-प्रतिज्ञापत्राची तरतूद(Provision for Self-Affidavit)
एखाद्या प्रकल्पात काही अडचणी निर्माण झाल्यास प्रकल्प प्रवर्तक रेराकडे नोंदणी करताना त्या प्रकल्पाची माहिती देणे टाळतात. नोंदणी करत असलेला पहिलाच प्रकल्प असल्याचे भासवून नोंदणी करतात. प्रकल्पाची नावे बदलून नवनवीन प्रकल्पात सहभागी होतात ज्याचा फटका ते सुरू करत असलेल्या नवीन प्रकल्पांनाही बसू शकतो. सोबतच याचा फटका प्रकल्पात नोंदणी करणाऱ्या ग्राहकांनाही बसू शकतो. आता महारेरा नोंदणीसाठी प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करायच्या या स्व-प्रतिज्ञापत्राच्या तरतुदीमुळे प्रवर्तकाला अशी माहिती लपवण्याची सोयच उरणार नाही. त्यामुळे खरेदीदारांची फसवणुक होणार नाही.
फॉर्ममध्ये काय ?(What is in the form?)
महारेराकडे नोंदणी करताना प्रकल्प व्यवस्थापकांना एक फॉर्म भरून द्यावा लागणार असून ज्यामध्ये प्रकल्प पूर्ण झाल्याची तारीख, प्रकल्पाशी संबंधित कुठल्याही रेराकडे तक्रार प्रलंबित असल्यास त्याचा क्रमांक, भरपाईपोटी प्रकल्पाच्या विरुद्ध एखादे वॉरंट जारी झाले असल्यास त्याचा संपूर्ण तपशील, शिवाय रेराने प्रकल्पाची नोंदणी रद्द केलेली असेल तर तेही यामध्ये तपशीलवार भरावे लागणार आहे.
ग्राहकांना कोणती माहिती मिळेल?(What information will consumers get?)
- नवीन प्रकल्पात सदनिका, प्लाॅटसाठी नोंदणी करताना प्रवर्तक आणि प्रकल्पातील सर्व संचालक यांची प्रकल्प पूर्ण करण्याबाबतची संपूर्ण माहिती मिळणार गुंतवणूक दाराला मिळेल
- प्रकल्प पूर्ण करण्याची त्यांची आर्थिक क्षमता आहे की नाही हे देखील समजेल
- आतापर्यंत किती प्रकल्प केले, ते वेळेत पूर्ण केले का? त्यांच्या प्रकल्पाविरोधात तक्रारी आहेत का? अशी माहिती ग्राहकांना खरेदीपूर्वीच समजणार आहे
- दिवसानुसार क्रमांक उपलब्ध असल्याने नेटवर जाऊन सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. भूखंड, सदनिका गुंतवणूक करताना निर्णय घ्यायला सोपे जाईल