Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

यापुढे WFH नाही! IT फर्म TCS च्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयातून करावे लागणार काम

TCS

Image Source : www.itp.net/business

आमचे क्लायंट TCS ऑफिसला भेट देत असतात आणि TCS चे वरिष्ठ अधिकारी देखील आता ऑफिसमधूनच काम करत आहेत. आता मात्र तुम्हाला TCS कार्यालयात आठवड्यातून किमान तीन दिवस काम करावे लागेल," अशा आशयाचा अधिकृत मेल TCS च्या कर्मचाऱ्यांना कंपनीतर्फे पाठवण्यात आला आहे.

कोविड-19 च्या संसर्गानंतर दोन वर्षांनी देशातली अधिकाधिक कार्यालये वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुविधा बंद करत आहेत, अनेक कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांनी कार्यालयातून काम करावे असे वाटते आहे. कोविड -19 संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यामुळे आता बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे. अशातच IT क्षेत्रातली अग्रगण्य कंपनीने, Tata Consultancy Services (TCS) ने त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या वर्कस्टेशनवर परत येण्यास सांगितले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रिमोट काम (Remote Work) करण्याची संधी कंपनीने दिली होती. ही सुविधा आता संपुष्टात आली आहे. TCS ने आपल्या कर्मचार्‍यांना काही दिवसांपूर्वी अधिकृत मेल पाठवत आठवड्यातून तीन दिवस किंवा त्यांच्या टीम पर्यवेक्षकाने (Team Supervisor) ठरवलेल्या रोस्टरनुसार कार्यालयातून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

"विशेषतः कार्यालयात हजर राहून बरेच काही साध्य केले जाऊ शकते, हे आमच्या लक्षात येऊ लागले आहे. कर्मचारी कार्यालयांना भेट देतात तेव्हा त्यांना TCS बद्दल आणि व्यवसायिक प्रगतीबद्दल एक नवीन दृष्टीकोन प्राप्त होत असतो. त्यामुळे आम्ही हा नियम लागू केला आहे." असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ), एन. गणपथी सुब्रमण्यम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सोबतच, कोविड संदर्भात कंपनी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणार आहे, असेही ते म्हणाले.

मूनलाईट (Moonlight Work) प्रकरणात झाली होती वाढ!

मागील वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये 'बिजनेस टुडे' च्या एका कार्यक्रमात बोलताना TCS चे CEO एन. गणपथी यांनी मुनलाईट प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. अल्पकालीन लाभासाठी कर्मचारी एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करतात पण हे कंपनीसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी हानिकारक आहे, असे ते म्हणाले होते.

काय आहे मूनलाईट वर्क 

वर्क फ्रॉम होम सुविधेचा लाभ घेणारे कर्मचारी एका कंपनीत काम करत असताना दुसऱ्या कंपनीत देखील काम करतात. अशावेळी एका कंपनीची माहिती दुसऱ्या कंपनीत दिली जाण्याचा धोका असतो. यामुळे प्रतिस्पर्धी कंपनीला  स्पर्धेतून बाहेर ठेवण्यासाठी WFH सुविधेला अनेक लोक विरोध करत आहेत.