TCS , Walmart , Fiserv, Swiss Re, Lululemon सह नऊ कंपन्यांना एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांसाठी सर्व समावेशक योजना आखणाऱ्या कंपन्यांना Wequity Awards द्वारे गौरवले गेले. भारतीय स्टार्टअप Wequity द्वारे या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारामागचा हेतू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
“आम्हाला भारतातील अशा प्रकारच्या खास पुरस्काराचे प्रदान करताना अभिमान वाटतो जे तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांसाठी आवश्यक ती काळजी घेतात” असे Wequity च्या संस्थापक आणि CEO गीता कन्नन म्हणाल्या.
देशभरातील वेगवगेळ्या 57 तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यामध्ये काम करणाऱ्या सुमारे 426 महिला कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            