Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Technologies IPO: टाटाचा 2004 नंतर प्रथमच IPO!

Tata Technologies IPO: टाटाचा 2004 नंतर प्रथमच IPO!

IPO Update : टाटा समुहाचा 2004 मध्ये टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ आला होता. त्यानंतर या 18 वर्षात टाटा समुहाकडून अद्याप एकही आयपीओ आलेला नाही. तसेच 2017 मध्ये नियुक्त झालेले टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील हा पहिला IPO असेल.

IPO Update : वाहन निर्मिती क्षेत्रातील टाटा मोटर्स कंपनी ही आपल्या टाटा टेक्नॉलॉजी (Tata Technology) कंपनीचा आयपीओ दाखल करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूह ग्लोबल प्रोडक्ट इंजिनिअरिंग कंपनी आणि डिजिटल सर्व्हिसेस कंपनी या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीची व्हॅल्यू अनलॉक करण्याच्या प्रयत्नात आहे. टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ (IPO) बाजारात आला तर टाटा ग्रुपकडून 2004 नंतर म्हणजे सुमारे 18 वर्षांनंतर प्रथमच आयपीओ येणार आहे.

टाटाने 18 वर्षांपूर्वी, 2004 मध्ये टीसीएस (Tata Consultancy Services) या आयटी कंपनीचा आयपीओ आणला होता. त्यावेळी रतन टाटा (Ratan Tata) हे टाटा ग्रुपचे अध्यक्ष होते. आता एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) हे टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत. 2017 मध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या कारकार्दीतला हा पहिलाच आयपीओ असणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीओचा आकार, किंमत अशी कोणतीच माहिती अजून अंतिम करण्यात आलेली नाही. या प्रक्रियेत देशातील आणि परदेशातील बॅंकांची मदत घेतली जाणार आहे. गुंतवणूकदारांनाही टाटाच्या आयपीओची नक्कीच प्रतिक्षा असणार आहे.

टाटा मोटर्सचा टाटा टेक्नॉलॉजीमध्ये 74 टक्के हिस्सा!

टाटा मोटर्सचा टाटा टेक्नॉलॉजीमध्ये 74 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. 2018 मध्ये टाटा मोटर्स टाटा टेक्नॉलॉजीमधील 43 टक्के हिस्सा वारबर्ग पिनकस (Warburg Pincus) यांना विकणार विकणार होते. पण तो व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. टाटा टेक्नॉलॉजीचे 2021-22 मध्ये 3529.6 कोटी रूपये एवढे उत्पन्न होते. यावर्षी कंपनीला 437 कोटी रूपयांचा नफा झाला आहे.