Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टीसीएस (TCS) म्हणजे काय?

टीसीएस (TCS) म्हणजे काय?

ग्राहकांकडून जमा केलेला TCS विक्रेत्याला सरकारने दिलेल्या वेळेतच भरणं बंधनकारक आहे.

टीसीएस  (Tax Collected at Source TCS) हा देखील एक प्रकारचा कर आहे जो भारत सरकार खरेदीदारांवर आकारतो. पण यात फक्त तेच लोक येतात, जे महागड्या वस्तू खरेदी करतात. कोणताही दुकानदार किंवा ई-कॉमर्स कंपनी हा कर आपल्या ग्राहकांकडून रोख किंवा ऑनलाइन पद्धतीने वसूल करतात. नंतर सरकारने दिलेल्या वेळेत आयकर विभाकडे जमा करतात. जर एखाद्या दुकानदाराने असे केले नाही. तर हे आयकर कायद्याचे उल्लंघन मानले जाते आणि कायद्यातील तरतुदींनुसार शिक्षा किंवा दंड होऊ शकतो.

टीसीएस म्हणजे काय? What is TCS?

टीसीएस म्हणजे टॅक्स कलेक्टड ॲट सोर्स (Tax Collected at Source). जेव्हा जेव्हा हा कर ग्राहकाकडून वसूल केला जातो तेव्हा किरकोळ विक्रेत्याला किंवा दुकानदाराला तो कर आयकर विभागाकडे जमा करावा लागतो. सरकारने हा कर मोटार वाहनांवर लागू केला आहे. सीबीडीटीच्या (Central Board of Direct Taxes CBDT) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्राहकाला आता 10 लाखांपेक्षा जास्त वाहन खरेदीवर 1% कर भरावा लागेल. किंवा जर एखाद्या व्यक्तीने 2 लाख पैशांपेक्षा जास्त रोख देऊन वाहन खरेदी केले, तर त्यात 1% टीसीएस (TCS) द्यावा लागेल.  तसेच आणखी महाग खरेदीवर हा कर जास्तीत जास्त 5 टक्क्यांपर्यंत असू शकतो . ग्राहकांकडून जमा केलेला TCS विक्रेत्याला त्याच्या सोईनुसार पण सरकारने दिलेल्या वेळेतच  भरणं बंधनकारक  आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांसाठी टीसीएस अनिवार्य

जीएसटीमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांसाठी टीसीएसचीही (TCS ) व्यवस्था करण्यात आली आहे. आता कोणतीही व्यक्ती जी ई-कॉमर्समधून 2.5 लाखांपेक्षा जास्त खरेदी करते त्यांना 2.5 टक्के टीसीएस (TCS ) भरावा लागतो.  जीएसटीमध्ये सध्याच्या तरतुदीनुसार, सर्व ई-कॉमर्स आणि इतर सर्व प्रकारच्या कंपन्या आणि व्यवसाय, मग ते लहान असोत किंवा मोठे, त्यांना त्यांच्या स्वत:च्या कंपनीची जीएसटीमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा कोणी त्याच्या कंपनीची GST मध्ये नोंदणी करते तेव्हा त्याला GST क्रमांक दिला जातो. आणि मग तो त्याच नंबरद्वारे त्याचे सर्व कर भरतो.  ई-कॉमर्स कंपन्यांना दर महिन्याला जमा होणारा TCS पुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सरकारकडे जमा करावा लागेल. आणि त्यांच्याकडे जमा केलेले TCS चे मासिक विवरण GSTR-8 फॉर्ममध्ये ठेवणे बंधनकारक आहे. याशिवाय त्या सर्व ई-कॉमर्स कंपन्यांनाही वार्षिक रिटर्न भरणे आवश्यक आहे. ज्यामध्ये वर्षभरात किती टीसीएस (TCS ) जमा झाले याचा तपशील द्यावा लागेल. हा फॉर्म GSTR-9B मध्ये उपलब्ध आहे.

TCS च्या पेमेंट आणि रिटर्न्सबद्दल माहिती

TCS कर सरकारकडे पेमेंट आणि रिटर्न भरण्याची तारीख दर तिसऱ्या महिन्यात असते. पहिले तीन महिने 7 एप्रिल, मे, जून पर्यंत भरायचे आहेत. आणि दुसरा टप्पा 7 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत आणि तिसरा टप्पा 7 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत आहे. आणि यामध्ये, उशिरा फाइल करण्यासाठी  15  तारखेपर्यंत मुदत देण्यात आहे आहे . TCS च्या सर्व रिटर्न विक्रेत्यांना चलान क्रमांक 281 अंतर्गत 7 दिवसांच्या आत भरावे लागेल. जर आपला टीसीएस (TCS) दिलेल्या वेळेत नाही भरला तर विक्रेत्याला त्या रकमेवर 1% व्याज भरावे. प्रत्येक कर संग्राहकाला दर तीन महिन्यांनी त्याचा रिटर्न फॉर्म 24EQ भरावा लागतो. आणि जर त्याने कोणताही TCS कर उशीरा भरला असेल तर जे काही व्याज असेल. टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी ते भरावे लागेल.

ऑनलाईन TCS  कसे भरायचे?

  1. एनएसडीएलच्या (NSDL) संकेतस्थळावर जावे. 
  2. पे टॅक्स ऑनलाईन या पर्यंत जाऊन आपण कोणत्या प्रकारचा टॅक्स भारताहोत ते निवडा. 
  3. फार्म आल्यावर त्यात आपली माहिती आणि कोणत्या वर्षाचं TCS भरत आहेत ते नमूद करा.   

TCS प्रमाणपत्र कधी मिळते

जेव्हा विक्रेता त्याचे त्रैमासिक TCS रिटर्न म्हणजेच फॉर्म 27EQ सबमिट करतो. त्यानंतर त्याला त्याच्या वस्तू खरेदी करणाऱ्याला TCS प्रमाणपत्र द्यावे लागेल. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  • विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या दोघांचेही नाव.
  • त्रैमासिक TCS रिटर्न भरणाऱ्या विक्रेत्याचा TAN क्रमांक.
  • खरेदीदार आणि विक्रेत्याचा पॅन कार्ड क्रमांक.
  • जमा झालेल्या सर्व कराची संपूर्ण माहिती.
  • कोणत्या दिवशी कर वसूल केला जातो.
  • त्यात किती कर आकारण्यात आला याची माहिती भरावी लागेल.
  • हे प्रमाणपत्र TCS त्रैमासिक विवरणपत्र भरल्यानंतर 15 दिवसांच्या आत उपलब्ध करून दिले जाते.

अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन किंवा सीएच्या मदतीने TCS भरू शकता.

IMAGE SOURCE - https://bit.ly/39hpYwv