Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MMRDA: मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट

MMRDA

Image Source : www.indianexpress.com

MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) मुंबई महानगर प्रदेशाची(MMR)अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी केंद्रातून मदत घेऊन हा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

MMRDA: केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करण्याचा उद्देश मनाशी बाळगला आहे. सरकारचा हा उद्देश पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाचा(MMR) सर्वांगीण विकास साधून येत्या 5 वर्षांत एमएमआरमधील(MMR) अर्थव्यवस्था 25,000 कोटी डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) डोळ्यासमोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास करून सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी एमएमआरडीएने सल्लागाराची नियुक्ती निविदा जारी केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर आराखड्याच्या कामाला सुरुवात करण्यात होणार आहे.

8 आर्थिक विकास केंद्र तयार करणार

मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीए(MMRDA) MTHL प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण होण्यास आले आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर या मार्गाच्या आसपासच्या परिसराचा विकास होणार आहे. हा विकास करण्यासाठी बीकेसीच्या धर्तीवर 8 आर्थिक विकास केंद्र तयार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने(MMRDA) घेतला आहे. केंद्राच्या मदतीने याठिकाणी अधिकाधिक गुंतवणूक आणून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न एमएमआरडीए करणार आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने पुढील पाच वर्षात एमएमआरमधील अर्थव्यवस्था 25,000 कोटी डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा 14 टक्के वाटा आहे. अशावेळी देशाला 5 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्था बनविताना महाराष्ट्राची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. त्यामध्येही महाराष्ट्राच्या देशांतर्गत उत्पादनात एमएमआरचा हिस्सा 40.26टक्के इतका आहे. तेव्हा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करताना राज्याच्या देशांतर्गत उत्पादनातील एमएमआरचा हिस्सा 40.26 टक्क्यांवरून 50टक्के नेण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.

सल्लागारांची नियुक्ती केली जाईल

25,000 कोटीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय योजना आखता येईल याचा अभ्यास करून सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात येईल. सल्लगार नियुक्तीसाठी गुरुवारी एमएमआरडीएने(MMRDA) निविदा जारी केल्या असून 3 मार्च ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे.