Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या नव्या संगणक प्रणालीचा सोडतीला फटका; 60 हजारांपैकी केवळ 1871 अर्ज मंजूर!

Mhada Lottery 2023

Image Source : www.magicbricks.com

Mhada Lottery 2023: कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला वेळ लागत असल्याने आणि अर्ज भरताना संगणक प्रणालीत अडथळे निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आत्तापर्यंत केवळ 1871अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Mhada Lottery 2023: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada) पुणे मंडळाने 5915 घरांसाठी सोडत काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार आतापर्यंत एकूण 59,746 जणांनी घरांसाठी अर्ज(Lottery Apply) केले आहेत. मात्र, नव्या संगणक प्रणालीनुसार सोडत निघणार असल्याने केवळ 1871 नागरिकांच्या अर्जांची प्रक्रिया आतापर्यंत पूर्ण झाली आहे तर उर्वरित अर्ज प्रक्रियेत आहेत. त्यामुळे नव्या संगणक प्रणालीचा म्हाडाला(Mhada) फटका बसल्याचे समोर आले आहे.

5979 पैकी 1871अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण

मध्यस्थांना आळा घालणे आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी इंटिग्रेडेट लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम(ILMS) 2.0 या नवीन संगणक प्रणालीद्वारे सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबईतील मुख्यालयाने(Mhada Mumbai Head Office) घेतला होता. त्यानुसार घरांसाठी अर्ज करताना पॅनकार्ड, आधारकार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर प्रमाणपत्र, शपथपत्र, छायाचित्र, ई-स्वाक्षरी आणि स्वीकृतीपत्र अशी 7 कागदपत्रे संगणक प्रणालीत अपलोड करायची होती. या कागदपत्रांच्या छाननीला उशीर होत असल्याने नागरिकांची निराशा झाली आहे.
म्हाडाकडून आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत घरांसाठी 59,746 जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 33,291 जणांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. 30,623 जणांचे पॅन कार्ड प्रमाणीकरण झाले असून 17,256 जणांनी रहिवास दाखला जोडला आहे.  त्यापैकी 8133 जणांचे रहिवास दाखल्यांचे प्रमाणीकरण झाले आहे, तर 9123 जणांनी जुने रहिवास दाखले जोडले आहेत. 10,420 जणांनी उत्पन्नाचे दाखले जोडले असून, त्यापैकी 7535 जणांचे दाखले प्रमाणित झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पूर्ण अर्ज भरलेले 5979 अर्ज असून त्यापैकी केवळ 1871अर्जधारकांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला वेळ लागत असल्याने आणि अर्ज भरताना संगणक प्रणालीत अडथळे निर्माण होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नव्या संगणक प्रणालीत त्रुटी नाहीत - अभियंता जितेंद्र जोशी

नव्या संगणक प्रणालीत त्रुटी असल्यामुळे म्हाडाच्या वरिष्ठांनी तातडीने बैठक घेऊन नवीन रहिवास दाखल्याची(Domicile Certificate) अट शिथिल करत जुना रहिवास दाखलाही ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. मात्र, इतर कागदपत्रांच्या प्रमाणीकरणाला विलंब लागत आहे त्यामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
म्हाडा पुणे मंडळाच्या ऑनलाईन(Online) सोडतीसाठी प्राप्त अर्जांपैकी पूर्ण प्रक्रिया झालेले आत्तापर्यंत 6000 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये संबंधित अर्जदारांनी जोडलेल्या कागदपत्रांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. संगणक प्रणालीत कोणत्याही त्रुटी नसून काम वेगाने सुरू आहे, असे आयएलएसएम(ILSM) प्रणाली, मुख्य अभियंता जितेंद्र जोशी(Jitendra Joshi) यांचे म्हणणे आहे.