Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai Metro: असा असेल मेट्रो 2A आणि 7 चा मार्ग; या ठिकाणी असतील स्थानके

Mumbai Metro Line 2A And Line 7

Image Source : www.indiatvnews.com

Mumbai Metro Line 2A And Line 7: मेट्रो लाइन 2A आणि 7 मार्गाचे संचालन महा मुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिडेट(Maha Mumbai Metro Rail Operation Corporation Limited) करणार असून मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडणार असून मेट्रो लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडणार आहे.

Mumbai Metro Line 2A And Line 7: मुंबईकरांच्या सेवेत लोकल(Local), मोनो(Mono) आणि मेट्रो(Metro) तत्परतेने उभ्या आहेत. त्यांच्या अविरत सेवेमुळे मुंबईकर सुखाने प्रवास करत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम चालू आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीने(MMRDA) सांगितल्यानुसार, मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन 2A आणि लाईन 7 वर लवकरच मेट्रो धावणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या मेट्रोचा मार्ग आणि स्थानके? चला तर जाणून घेऊयात.  

मेट्रोच्या दोन्ही लाईनवर एकूण किती स्थानके असणार?

पश्चिम उपनगरात होणाऱ्या ट्रॅफिकवर उपाय म्हणून मेट्रो लाईन 2A आणि 7 लवकरच सुरू होणार आहे. एमएमआरडीएनुसार(MMRDA), नव्या वर्षात मुंबईकरांना नव्या मार्गावरील मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. त्यासंदर्भात मेट्रोला आरडीएसओकडून(RDSO) आवश्यक ती मंजुरी मिळाली आहे. मेट्रो 2A आणि 7 चा जवळपास 20 किलोमीटरचा पहिला टप्पा एप्रिल 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता. तर उर्वरित जवळपास 17 किलोमीटरचा मार्ग जानेवारीमध्ये सुरू केला जाणार आहे. मेट्रोच्या या दोन्ही लाईनवर एकूण 30 स्टेशन असणार आहेत. या दोन्ही लाईन्स सुरू झाल्यानंतर लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मेट्रो लाईन 2A - मार्ग आणि स्थानके जाणून घ्या

मेट्रो लाईन 2A हा मार्ग दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत(Dahisar West to DN Nagar) असणार आहे. याकरिता 6410 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या मार्गाची संपूर्ण लांबी 18.6 किलोमीटर इतकी आहे. या मार्गावर 17 स्थानके असणार आहे. अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर या ठिकाणी स्थानके असणार आहेत.

मेट्रो लाईन 7 - मार्ग आणि स्थानके जाणून घ्या

मेट्रो लाईन 7 चा मार्ग हा अंधेरी ते दहिसरपर्यंत(Andheri to Dahisar) असेल. हा मार्ग वेस्टर्न एक्सप्रेससह 16.5 किलोमीटरपर्यंतचा असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 13 स्थानके असणार आहे. जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबणार आहे. या मार्गासाठी एकूण 6208 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मेट्रो मार्गाचे  संचालन महा मुंबई मेट्रो रेल ऑपरेशम कॉर्पोरेशन लिमिडेट(Maha Mumbai Metro Rail Operation Corporation Limited)  करणार असून मुंबई मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडणार तर मेट्रो लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडणार आहे.