Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mumbai Metro Update: मुंबईतील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील 2A आणि 7 लाईन लवकरच होणार सुरू

Mumbai Metro

Image Source : www.newsdrum.in

Mumbai Metro Update: मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन 2A आणि लाईन 7 वर लवकरच काम सुरू होईल, त्यामुळे 16 लाख प्रवासी सहज प्रवास करू शकणार आहेत.

Mumbai Metro Update: मुंबईकरांच्या सेवेत लोकल, मोनो आणि मेट्रो तत्परतेने उभ्या आहेत. त्यांच्या अविरत सेवेमुळे मुंबईकर सुखाने प्रवास करत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे काम चालू आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीने(MMRDA) सांगितल्यानुसार, मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन 2A आणि लाईन 7 वर लवकरच काम सुरू होईल. त्यामुळे लवकरच या मार्गावरील मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहे.

मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन 2A आणि लाईन 7 वर लवकरच काम सुरू

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांचा(Mumbai) प्रवासाचा त्रास आता संपणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटीने(MMRDA) सांगितल्यानुसार, मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील लाईन 2A आणि लाईन 7 वर लवकरच काम सुरू होईल. त्यामुळे लवकरच या मार्गावरील मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहे. गेल्या वर्षी 2A मार्ग एप्रिलमध्ये वाहतुकीसाठी अंशत: खुला करण्यात आला होता.

डहाणूकरवाडी ते डी.एन.नगर आणि आरे रोड ते अंधेरी महामार्ग जोडणार

लाईन 2A कांदिवलीतील डहाणूकरवाडी ते डी.एन. नगर आणि लाईन 7 आरे रोडला अंधेरी महामार्गाला जोडते. MMRDA मेट्रो लाईन 2A आणि 7 वर 8 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत 16 तासांचा मेगा ब्लॉक ठेवला होता. ज्यामुळे फेज I मेट्रो लाईन फेज II लाईनसह एकत्रित करण्यासाठी एकात्मिक सिग्नलिंग सिस्टीमच्या चाचणीसाठी मदत झाली आहे.

16 लाखाहून अधिक प्रवासी सहज करतील प्रवास

एमएमआरडीएने(MMRDA) जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन्ही मार्ग पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल. MMRDA मेट्रोपॉलिटन कमिशनर एस.व्ही.आर श्रीनिवास(S.V.R. Shrinivas) म्हणाले की, “मेट्रो लाईनचे सर्व सिव्हिल वर्क आणि सिस्टीम वर्क पूर्ण झाले आहे आणि लवकरच मेट्रो लाईन 2A आणि 7 चा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी सुरू करण्यात येईल.” या मार्गिका वर्सोवा-अंधेरी-घाटकोपरला जोडणाऱ्या मुंबईतील पहिल्या मेट्रो कॉरिडॉरला जोडण्यात येतील. 
2A चे बांधकाम नोव्हेंबर 2016 मध्ये सुरू करण्यात असून एका अंदाजानुसार, 2A मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरू झाल्यानंतर, दररोज 16 लाखांहून अधिक प्रवासी सहज प्रवास करू शकणार आहेत. या मार्गावर एकूण 37 स्थानके तयार करण्यात आली आहेत.