Mhada Lottery 2023: लोकांचे गृहस्वप्न साकार करण्याचे काम म्हाडा(Mhada) करत असून रास्त किंमत आणि उत्तम गुणवत्तेमुळे म्हाडाच्या घरांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे(MHADB) सुमारे 4,000 घरांच्या विक्रीसाठी मार्चमध्ये लॉटरी(Mhada Lottery 2023) लवकरच काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण विभागाच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सोडतीचे तपशील सादर केले असून लिंक रोडवरील गोरेगाव पश्चिमेकडील पहाडी परिसरात सुमारे 2,200 घरे तयार होत आहेत, तर उर्वरित घरे पवई, सायन, बोरिवली इत्यादी ठिकाणी असणार आहेत.
या ठिकाणी असतील घरे
म्हाडा लवकरच मुंबईमधील गोरेगाव, पवई,सायन आणि बोरिवली या ठिकाणी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढणार आहे. साधारण मार्चच्या आसपास ही लॉटरी काढण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. 4000 घरांच्या या लॉटरीमध्ये लिंक रोडवरील गोरेगाव पश्चिमेकडील पहाडी परिसरात सुमारे 2,200 घरे तयार होत आहेत. तर उर्वरित घरे ही पवई, सायन, बोरिवली इत्यादी ठिकाणी असणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग(EWS), निम्न उत्पन्न गट(LIG), मध्यम उत्पन्न गट(MIG), आणि उच्च उत्पन्न गट या चार प्रवर्गांसाठी ही सोडत निघणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न विभागासाठी 60 टक्के घरं
म्हाडाच्या विकल्या जाणार्या 4,000 घरांपैकी 60 टक्के घरे EWS आणि LIG श्रेणींमध्ये येत आहेत. MIG आणि HIG ला उर्वरित 40 टक्के घरे देण्यात येणार आहेत. EWS आणि LIG गटांमधील घरांची किंमत अंदाजे 35 लाख आणि 45 लाख अशी असणार आहे. MIG आणि HIG घरांच्या किंमती अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत.
अर्जदाराने अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे(Documents) सादर करणे गरजेचे आहे. अपात्र असलेले अर्ज तपासण्यासाठी आणि उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी एक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. लॉटरी जिंकल्यानंतर, विजेत्यांनी फ्लॅटचा ताबा घेतला पाहिजे आणि 30 ते 45 दिवसांच्या आत पेमेंट प्रक्रिया(Payment Process) पूर्ण करावी लागणार आहे.