Mhada Lottery 2023: नवीन वर्षात तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 2023 मध्ये पहिली(First Lottery in New Year) लॉटरी लवकरच म्हाडाकडून(Mhada) काढली जाणार आहे. कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे व नवी मुंबई येथे म्हाडाच्या घरांची लॉटरी काढली जाणार असून तब्बल 4000 घरांची सोडत म्हाडा काढणार आहे. त्यामुळे ठाणेकरांची वर्षभरापासूनची म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा आता संपणार आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
म्हाडाच्या 4000 घरांची सोडत(Allotment of 4000 houses of Mhada)
कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे(Thane), नवी मुंबई(Navi Mumbai) येथे म्हाडाच्या घरांची लॉटरी काढली जाणार असून याअंतर्गत तब्बल 4000 घरे मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या घरांच्या सोडतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून घरांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की पुढील आठवड्यात घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य लोकांना ठाण्यात 15 ते 44 लाख रुपयांमध्ये हक्काचे घर खरेदी करता येणार आहे. नुकतीच पुणे महामंडळाने 5990 घरांची सोडतीची प्रक्रिया चालू केली आहे.
म्हाडाची घरे कुठे व कोणासाठी असतील?(Where and for whom will Mhada's houses be?)
- 1250 घरे ही पंतप्रधान आवास योजने(PMAY) अंतर्गत येणार आहेत
- 249 घरे ही ठाण्यामधील पाचपाखाडीत(Panchpakhadi) रेमंड प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत
- अत्यल्प उत्पन्न गटासाठी अंदाजे 300 चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार असून याची किंमत 15,50,000 असणार आहे
- ठाण्यात पत्रकारांसाठी(Journalist) 67 घरे वर्तकनगर(Vartak Nagar) येथे राखीव ठेवण्यात आली आहेत. ज्याची किंमत 40 ते 44 लाखांच्या दरम्यान असणार आहे