Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

KEM Hospital Scam: गरीब रूग्ण सहाय्यता निधीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

KEM Hospital Scam

Image Source : www.timesnowmarathi.com

KEM Hospital Scam: आत्तापर्यंत फक्त 65 लाखांचा घोटाळा उघडकीस आला असून उर्वरीत नोंदवहीची सखोल चौकशी करावी, जेणेकरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा बाहेर येईल, असा दावाही पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

KEM Hospital Scam: मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातील(KEM Hospital) रुग्ण सहाय्यता निधीत(PBCF) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत फक्त 65 लाखांचा घोटाळा उघडकीस आला असून उर्वरीत नोंदवहीची सखोल चौकशी करावी, जेणेकरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा बाहेर येईल, असा दावाही पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा(Ravi Raja) यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून गरीब रुग्णांसाठीच्या सहाय्यता निधीचा पारदर्शक वापर व्हावा, अशी मागणी त्यांनी पालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल(Iqbal Singh Chahal) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. रवी राजा यांच्या भूमिकेनंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. चला तर या प्रकरणाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

नेमका प्रकार काय?

केईएम रूग्णालयात गरीब रुग्णांच्या मदतीसाठी 'गरीब रूग्ण सहाय्यता निधी(PBCF)' गोळा करण्यात येतो. विविध माध्यमांतून केईएम रूग्णालयाला हा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. याच निधीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. 2017 पासूनच्या जुन्या प्रकरणांमध्ये खोटी कागदपत्रे तयार करून या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा गैरप्रकार करताना अधिष्ठाता, उप अधिष्ठाता, एएमओ आणि युनिट हेड यांच्या बोगस सह्या आणि बोगस स्टॅम्प तयार करण्यात आले होते. या चौकशी दरम्यान केवळ एका नोंदवहीत 65 लाखांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. तर उर्वरीत नोंदवहीतील व्यवहारांची कसून चौकशी केल्यास कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर येऊ शकतो, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

कंत्राटी कर्मचारी महिलेला अटक

या घोटाळ्यामध्ये रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी सोनाली गायकवाड(Sonali Gaikwad) हिला अटकही झाली आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती पाहता फक्त एक कंत्राटी कर्मचारी हा घोटाळा करू शकत नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्याला घोटाळ्यात मदत करणाऱ्यांचीही नावे समोर येणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांना केईएम प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. हे काम केवळ एका व्यक्तीचे नसून बरेच लोक यामध्ये सामील असल्याचे रवी राजा यांचे म्हणणे आहे.