Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Scam: ZZZZ Best स्कॅम काय होता? जाणून घ्या हा स्कॅम कसा उघडकीस आला

ZZZZ Best Scam

Market Scam: ZZZZ बेस्ट ही 1982 मध्ये बॅरी मिन्को (Bary Minkow) नावाच्या 16 वर्षांच्या अमेरिकेतील एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सुरू केलेली इंडस्ट्रीयल कार्पेट क्लिनिंग कंपनी (Industrial Carpet Cleaning Company) होती. या कंपनीच्या माध्यमातून मिन्कोने लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती.

ZZZZ बेस्ट ही बॅरी मिन्को (Bary Minkow) यांनी स्थापन केलेली कार्पेट क्लिनिंग आणि रिस्टोरेशन कंपनी होती. जी त्यांच्या पॉन्झी स्कीमसाठी प्रसिद्ध होती. ही कंपनी डिसेंबर 1986 मध्ये पब्लिक लिस्टेड होऊन लगेच तिला 300 मिलियन डॉलर्सचे मूल्य प्राप्त झाले होते. कंपनीने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering-IPO) आणल्यानंतर अवघ्या सात महिन्यांत ZZZZ बेस्ट कंपनी बँकरप्ट (Bankrupt) झाली आणि तिचे अॅसेट अंदाजे 64,000 डॉलरला विकण्यात आले होते. आजच्या मार्केट स्कॅम (Market Scam)मध्ये आपण याच ZZZZ बेस्ट आणि त्यांनी केलेल्या स्कॅमबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग बघुयात काय आहे, ZZZZ Best Scam.

ZZZZ बेस्ट नक्की आहे तरी काय?

ZZZZ बेस्ट ही 1982 मध्ये बॅरी मिन्को (Bary Minkow) नावाच्या 16 वर्षांच्या अमेरिकेतील एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सुरू केलेली इंडस्ट्रीयल कार्पेट क्लिनिंग कंपनी (Industrial Carpet Cleaning Company) होती. मिन्कोने 3 इतर कर्मचारी आणि 4 फोनच्या मदतीने घराच्या गॅरेजमध्ये ZZZZ बेस्टची स्थापना केली होती. त्यावेळी त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे त्याला या कंपनीच्या कामासाठी मित्रांवर अवलंबून राहावे लागत होते. सुरूवातीला मिन्कोला त्याचा बेसिक खर्च भागवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. दोन बॅंकांनी तर त्याचे खातेही बंद केले होते. त्यामुळे मग मिन्टोने आजीचे दागिने चोरून विकणे, बोगस क्रेडिट कार्डचा वापर करणे अशा चुकीच्या गोष्टी करण्यास सुरूवात केली होती. ZZZZ बेस्ट ही कंपनी म्हणून 70 हजार डॉलरपेक्षा जास्त फसव्या शुल्कांचा समावेश असलेल्या क्रेडिट कार्ड घोटाळ्यात सहभागी होती.

Barry Minkow Books
बॅरी मिन्कोने स्वत: हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाची किंमत 9,163 रुपये आहे. मिन्कोने अजून दोन पुस्तके लिहिली आहेत.  Image Source: https://www.goodreads.com/

ZZZZ बेस्ट कंपनीची स्कीम काय होती?

मिन्को आणि त्यांचे व्यावसायिक सहयोगी टॉम पॅजेट यांनी बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांची फसवणूक करण्यासाठी लाखो डॉलर्सची आंतरराज्य मूल्यमापन सेवा देणारी एक काल्पनिक कंपनी तयार केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मिन्कोने तयार केलेल्या खोट्या फायनान्शिअल स्टेटमेन्टच्याआधारे गुंतवणूकदार आणि बॅंकांना भुरळ घातली. यामुळे गुंतवणूकदारांचा ZZZZ बेस्टमधला इंटरेस्ट दिवसेंदिवस वाढू लागला.

हे सर्व योग्य पद्धतीने सुरू असताना ZZZZ बेस्टला नंतर रोख कॅश फ्लो समस्या जाणवू लागली. त्यावर उपाय म्हणून मिन्कोने 25 मिलियन डॉलर्समध्ये कीसर्व्ह ही कार्पेट क्लीनिंग करणारी कंपनी विकत घेण्याचा प्लॅन तयार केला. त्याच्या मते, KeyServ कडून मिळणारा महसूल हा ही स्कीम बंद करण्यासाठी पुरेशी ठरू शकते. पण हे सर्व बंद होण्यापूर्वीच एका महिलेने ZZZZ बेस्ट विरोधात फसवणुकीची मोहीम सुरू केली. परिणामी कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने घसरण होऊ लागली. कर्जदारांची देणी थकल्याने त्यांचा ही ससेमिरा सुरू झाला. अखेर प्रत्यक्षात सुरू नसलेल्या कंपन्यांमागील सत्य उघड झाले आणि हा घोटाळा उघड झाला. 

मिन्कोचे काय झाले

जानेवारी 1988 मध्ये, मिन्को आणि इतर 11 जणांना कोर्टाने फसवणूक, मनी लाँड्रिंग, सिक्युरिटीज फसवणूक, घोटाळा, बँक फसवणूक आणि करचोरी आदी कलमांखाली आरोप लावून 25 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच 26 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त भरपाई देण्याचे आदेश ही कोर्टाने दिले होते. मिन्कोची 1995 मध्ये तुरूंगातून सुटका झाल्यानंतर तो कॅलिफोर्नियामधील एका चर्चचा पास्टर म्हणून काम पाहू लागला. पण पुन्हा त्याने काही चुकीचे मार्ग स्वीकारले त्यामुळे कोर्टाने 2011 मध्ये पुन्हा त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती.