Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jobs in India : McDonald’s कंपनीची भारतात विस्तार योजना, 5,000 लोकांना नोकरीची संधी

Macdonalds

मॅकडोनाल्ड्स (McDonald’s India Inc) कंपनी उत्तर व पूर्व भारतात (North & Eastern India) आपली आऊटलेट (Mcdonald Outlets) काढणार आहे. आणि त्यासाठी कंपनीला येणाऱ्या दिवसांमध्ये 5,000 कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे

मॅकडोनाल्ड्स इंडिया (Mcdonald’s India Inc) कंपनीने उत्तर व पूर्ण भारतात विस्ताराची (Expandion) योजना आखली आहे. आणि येत्या तीन वर्षांत त्यांना या भागातल्या आऊटलेट्सची संख्या दुप्पट म्हणजे 3,000 करायची आहे. कंपनीने 13 डिसेंबरला आसामची (Assam) राजधानी गुवाहाटी (Guwahati) इथं या भागातलं पहिलं मोठं आऊटलेट सुरू केलं आहे. या आऊटलेटमध्ये एकावेळी 220 लोकांना बसता येऊ शकेल.    

हे आऊटलेट सुरू करतानाच कंपनीने उत्तर व पूर्व भारतासाठी आपली आगामी योजना जाहीर केली आहे. मॅकडोनाल्ड्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) राजीव रंजन यांनी पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेला सांगितलं की, ‘आगामी तीन वर्षांत कंपनीला 5,000 नवीन कर्मचारी सेवेत घ्यायचे आहेत. ईशान्य भारतात राजधानीच्या ठिकाणी किमान 5,000 स्क्वेअर फिट आकाराचं आऊटलेट असावं असं कंपनीचं उद्दिष्टं आहे.’   

गुवाहाटीमध्ये सुरू झालेलं आऊटलेट 6,700 स्क्वेअर फुटांचं आहे. मॅकडोनाल्ड्स कंपनी बर्गर, फ्राईज यांचं उत्पादन आणि डिलिव्हरी या क्षेत्रातली कंपनी आहे.    

‘कोव्हिडचा काळ आता मागे सरलाय. आणि येणारे दिवस अन्न उद्योगासाठी चांगलेच आहेत , असा कंपनीचा होरा आहे. त्यामुळे नवीन प्रदेशांमध्ये आम्हाला शिरकाव करायचा आहे. शिवाय मधल्या काळात कंपनी एका कायदेशीर प्रकरणात अडकली होती. ते प्रकरणही आता संपलंय,’ रंजन यांनी सांगितलं.    

भारतीय बाजारपेठेत विस्ताराच्या योजना आखताना, 2020मध्ये मॅकडोनाल्ड्स कंपनीने भारतातील MMG समुहाचे अध्यक्ष संजीव अगरवाल यांच्याशी एक करार केला होता. या समुहाला कंपनीने ईशान्य भारतातला बिझिनेस सांभाळायला दिला होता. पण, या भागिदारीत दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आणि MMG समुहाने मॅकडोनाल्ड्स विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली.   

या प्रकरणामुळे मॅकडोनाल्ड्स कंपनीला उत्तर व पूर्व भारतात विस्तारही करता येत नव्हता. पण, MMG समुहाबरोबरची भागिदारी संपुष्टात आल्यानंतर आता कंपनीची विस्तार योजना आकार घेत आहे. भारतीय बाजारपेठेत उतरताना मॅकडोनाल्ड्स कंपनीने MMG समुह आणि वेस्टलाईफ समुह (Westlife Group) यांच्याबरोबर करार केला होता. MMG समुह उत्तर व पूर्व भारतात आऊटलेट उभारणं आणि त्यांची देखभाल अर्थात फ्रँचाईजीचं काम बघणार होता. तर पश्चिम, मध्य व दक्षिण भारतात हे काम वेस्टलाईफ समुहाकडे होतं. MMG समुहाबरोबरच्या भांडणामुळे पूर्व आणि उत्तर भारतात मॅकडोनाल्ड कंपनी विस्तार करू शकली नाही. सध्या या भागात कंपनीची फक्त 156 आऊटलेट्स आहेत. हा आकडा आता कंपनीला वाढवायचा आहे.