इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसच्या (ISB) 2023 साली स्नातकोत्तर पदविका (Post Graduate Diploma)अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी चांगल्या ऑफर मिळाल्या आहेत . आणि विद्यार्थ्यांना मिळणारा सरासरी वार्षिक पगार 34 लाखांच्या घरात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मिळणाऱ्या मोबदल्यात अडीच पटींनी वाढ झाली आहे.
अभियांत्रिकी (Engineering) प्रमाणेच बँकिंग क्षेत्रातही (Banking) अलीकडे नोकरीच्या चांगल्या संधी दिसून आल्या आहेत. आणि ISB च्या कॅम्पस मुलाखतीत (Campus Interview) हेच चित्र दिसून आलं. यातल्या 79% विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन शास्त्राचा (Management Course) अभ्यासक्रम पूर्ण करून आपलं आधीचं कार्यक्षेत्र बदललं आहे.
ज्या 222 कंपन्यांनी नोकऱ्या देऊ केल्या त्या माहिती-तंत्रज्ञान, FMCG, रिटेल, BFSI तसंच ITES अशा क्षेत्रातल्या आहेत. यावर्षी मिळालेल्या एकूण नोकऱ्यांपैकी 36 ऑफर या परदेशातल्या कंपन्यांकडून आल्या आहेत.
आता मिळालेल्या ऑफर पैकी 14% नोकऱ्या या टीम लीडर किंवा इतर वरच्या ठिकाणी असलेल्या जागा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे यंदा नोकरी मिळवाण्यांमध्ये मुलींचं प्रमाण 40% आहे.
ISB संस्थेच्या देशातल्या सर्व शाखांमध्ये एकाच वेळी कॅम्पस मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आणि सामायिकपणे तो पार पाडला जातो. सलग तिसऱ्या वर्षी मुलाखती ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या आहेत.
मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत देशातलं नोकरीचं चित्र हळू हळू सुधारताना दिसतंय.
व्यवसथापन शास्त्रात स्ट्रॅटजिक मॅनेजमेंट म्हणजेच धोरणात्मक व्यवस्थापन ही स्वतंत्र शाखा उभी राहत आहे. आणि अलीकडे या क्षेत्रातही नोकरीच्या संधी वाढल्या आहेत, असं निरीक्षण ISB संस्थेचे उप डिन रामभद्रन थिरुमलई यांनी म्हटलं आहे.