भारतातल्या फ्लेक्सी स्टाफिंग उद्योगाने (Flexi Staffing Industry) जुलै - सप्टेंबर 2022 मध्ये 78,000 ची नोकर भरती (Employment Generation) केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये मागणी वाढल्यामुळे हा सकारात्मक बदल झाल्याचं जाणकार सांगतात. नवीन निर्माण झालेल्या नोकऱ्या या ISF चा भाग म्हणून आणि माहिती-तंत्रज्ञान विभागात निर्माण झाल्या.
फ्लेक्सी स्टाफिंग (Flexi Staffing) ही कंपनी देशातली एक मुख्य औद्योगिक संस्था आहे. आणि औद्योगिक क्षेत्रातली (Industrial Sector) नोकर भरती, कामगारांना मिळणाऱ्या सुविधांचं व्यवस्थापन (Working Facility Management) आणि सुरक्षाविषयक सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवते.
भारतीय अर्थव्यवस्थेत FMCG, ई-कॉमर्स, उत्पादन क्षेत्र, रिटेल, लॉजिस्टिक्स तसंच बँकिंग, पर्यटन, इन्श्युरन्स अशा क्षेत्रांचा विस्तार होतोय. आणि त्यामुळे ही नोकर भरती वाढल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रावर मात्र दबाव होता.
देशातल्या 110 कंपन्या या ISF च्या सदस्य आहेत. आणि त्यांनी केलेली नोकरभरती या आकडेवारीत धरलेली आहे.
‘लॉकडाऊन पूर्णपणे संपलेला हा पहिला सणांचा हंगाम आहे. त्यामुळे लोकांमध्ये वस्तू आणि सेवांची मागणी वाढलेली असेल असा अंदाज होताच. तेच दिसून आल्यामुळे नोकर भरतीतही वाढ झाली आहे. आमच्या सदस्य कंपन्यांनी ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या काळात 2.32 लाख नोकर भरती केली. त्यावरून देशातलं वातावरण समजू शकेल.’ ISF चे अध्यक्ष लोहित भाटिया म्हणाले.
आता ISF सदस्य कंपन्यांची मिळून कर्मचारी संख्या 14 लाखांच्या घरात पोहोचली आहे.
साधारणपणे आकाराने छोट्या आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या या ISF संस्थेचा भाग असतात. अशा कंपन्यांना नोकर भरती, त्यांच्या कामाचं व्यवस्थापन आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा यावर सल्ला देण्याचं आणि लक्ष ठेवण्याचं काम ISSF ही संस्था करते.