Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jobs in India : सेवा क्षेत्रात (Service Sector) रोजगाराच्या सर्वाधिक संधी

Service Sector Jobs

Image Source : www.indiarag.com

वर्ष 2022 मध्ये सेवा क्षेत्रात देशात सर्वाधिक लोकांना रोजगार मिळवून दिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रातली रोजगार वृद्धी 7% नी जास्त होती. आणि देशाच्या एकूण उपलब्ध रोजगारापैकी 16% नोकऱ्या सेवा क्षेत्रातल्या होत्या.

सेवा क्षेत्राने (Service Sector) वर्ष 2022 मध्ये देशात सर्वाधिक लोकांना रोजगार (Employment) मिळवून दिल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. या क्षेत्रातला रोजगार गेल्यावर्षीच्या तुलनेत 5 ते 7%नी वाढला . अवसर (Avsar) या स्वत: सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ही कंपनी कौशल्य व्यवस्थापन क्षेत्राला तांत्रिक आणि तंत्रविषयक मदत करण्याचं काम ही संस्था करते.     

सेवा क्षेत्राच्या (Service Sector) पाठोपाठ ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) आणि उत्पादन क्षेत्रात (Manufacturing Sector) 3-5 % रोजगार वाढला. सेवा क्षेत्रात मिळालेल्या नोकऱ्या घरपोच डिलिव्हरी (Home Delivery), व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय जबाबदारी सांभाळणे (Managerial, Administrative Work) तसंच मजुरी किंवा कामगार वर्गातल्या असतात.      

अहवालातली महत्त्वाची निरीक्षणं Important Findings in the Report   

रोजगाराची (Employment) एकूण आकडेवारी पाहता या अहवालात काही निरीक्षणंही मांडण्यात आली आहेत. कोव्हिडमुळे (Covid 19) थांबलेली नोकर भरती माहिती-तंत्रज्ञान (IT) क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांमध्ये हळू हळू पूर्ववत सुरू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. कारण, एकूण रोजगार निर्मितीतली (Employment Generation) वाढ 25% नोंदवण्यात आली.     

कोव्हिडच्या नंतर गिग इकॉनॉमी आणि घरपोच सेवांचा विकास झालाय. तसंच इतर नोकऱ्यांमध्येही काही दिवस घरुन आणि काही काही दिवस ऑफिसमध्ये (Hy Breed) असं कामाचं स्वरुप असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण या अहवालात मांडण्यात आलंय. म्हणजेच, कामाचं स्वरुप आता बदलतंय. खासकरून 2022 सालच्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये हा ट्रेंड दिसून आला.     

एकीकडे नोकरीच्या संधी वाढत असताना अनेक कंपन्यांमध्ये नोकर कपातीचा निर्णयही झाला. आणि यामध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीवर होतं. आताही 2023 मध्ये नोकर कपात सुरूच राहील. पण, नवीन रोजगार निर्मितीही आधीच्या वर्षाच्या तुलनेत जास्त असेल असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.     

शहरी आणि निम-शहरी भागात झालेली रोजगार निर्मिती पाहिली असता दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये इतरांच्या तुलनेत 25% जास्त रोजगार निर्मिती झाली. त्यानंतर कोलकाता आणि हैदराबाद या शहरांचा क्रमांक होता. यातल्या बहुतेक नोकऱ्या गिग इकॉनॉमी तसंच एखादी सेवा पुरवण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञान विषयक सपोर्टसाठी होत्या.     

महिलांना नोकरी मिळण्याचं प्रमाण 2022मध्ये वाढलं आहे. पुरुष विरुद्ध महिला हे गुणोत्तर 2022मध्ये 58:42 असं होतं. हेच प्रमाण आधीच्या वर्षी 62:38 असं होतं. रिअल इस्टेट, बँकिंग, अपारंपरिक ऊर्जा, आरोग्यसेवा आणि महिती-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये नोकरी मिळण्याचं प्रमाण सर्वाधिक असेल आणि हाच ट्रेंड पुढच्या वर्षीही राहील, असं या अहवालात म्हटलं आहे.