Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing : 2021-22 आर्थिक वर्षासाठी कोणता ITR फॉर्म लागू आहे?

income tax

एखाद्या व्यक्तीचे एका आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return File) करणे बंधनकारक आहे. तसेच रिटर्न फाईल करताना योग्य आयटीआर फॉर्म निवडणे, तितकेच महत्त्वाचे आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes - CBDT) आर्थिक वर्ष 2021-22 आणि असेसमेंट वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्यासाठी आयटीआर-1, आयटीआर-2, आणि आयटीआर-4 फॉर्म www.incometaxgov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीबीडीटीने 21 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे की, निकष आणि अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती ऑनलाईन आयटीआर फाईल करू शकतात. पण यासाठी संबंधित करदात्याला त्याला लागू असलेला आयटीआर फॉर्मचा योग्य प्रकार माहित असणे महत्त्वाचे आहे.

तुमच्यासाठी कोणता आयटीआर फॉर्म लागू आहे? 

आयटीआर रिटर्न फाईल करताना कोणता आयटीआर फॉर्म वापरावा? हा करदात्याच्यादृष्टिने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. साधारणपणे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना 7 प्रकारचे ITR फॉर्म उपलब्ध असतात. आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयटीआर फॉर्म दाखल करण्याच्या सूचना इन्कम टॅक्स विभागाने अद्याप उपलब्ध करून दिलेल्या नाहीच. त्यामुळे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मागील वर्षाच्या सूचना लागू आहेत; त्या खाली दिल्या आहेत.

तुम्हाला कोणता आयटीआर फॉर्म लागू होतो?

ITR Form 2022

करदायित्व शून्य असलं तरी दंड लागू

जर पगारदार (Salaried) व्यक्तींनी 31 जुलै, 2022 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल न केल्यास, 31 जुलै नंतर रिटर्न फाईल करण्यासाठी त्यांच्याकडून 1 ते 5 हजार रूपयांपर्यंत दंड आकारला जाईल आणि हा दंड भरल्याशिवाय आयटीआर भरताच येणार नाही. एखाद्याचे करदायित्व (tax liability) शून्य असले तरी त्याला दंड भरावा लागणार आहे. तसेच, नवीन सवलतीच्या टॅक्स प्रणालीच्या निवडीस पात्र होण्यासाठी, संबंधित करदात्याला 31 जुलै, 2022 पूर्वी आयटीआर भरणे आवश्यक आहे.

इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत दिलेल्या मुदतीत एखाद्याने आयटीआर रिटर्न फाईन न केल्यास, त्याला ते असेसमेंट वर्ष संपल्यानंतर 2 वर्षांच्या आत आयटीआर फाईल करता येते. पण त्याला लागू असलेल्या इन्कम टॅक्सवर आणि देय रकमेच्या व्याजाच्या एकूण रकमेवर 25 टक्के किंवा 50 टक्के अतिरिक्त टॅक्स भरावा लागेल.

आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयटीआर दाखल करण्यापूर्वी करदात्यांनी अ‍ॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS) मध्ये इन्कम टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांनी नोंदवलेली माहिती व्हेरिफाय करून घेणं आवश्यक आहे. अन्यथा चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी टॅक्स विभागाकडून नोटीस येऊ शकते.