Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै; जाणून घ्या ऑनलाईन रिटर्न भरण्याची प्रक्रिया

tax return deadline

शेवटच्या क्षणी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल (ITR filing) करणे टाळा आणि आयटीआर वेळेवर भरा. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरण्याचे (ITR filing last date) अनेक फायदे आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 चा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filling last date) फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ITR फाईल करून ऐनवेळी होणाऱ्या चुका टाळल्या पाहिजेत. अंतिम तारखेच्या आता ITR फाईल करण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर 31 जुलैपर्यंत कोणीकोणी ITR फाईल करणं आवश्यक आहे, ते समजून घेऊ.

वैयक्तिक व पगारदार करदात्यांसाठी ITR फाईल करण्याची शेवटची तारीख काय?

वैयक्तिक व पगारदार व्यक्ती, ज्यांना त्यांच्या बॅंक खात्याचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी आयटीआर रिटर्न फाईल करण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै, 2023 आहे.

हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) करदात्यांसाठी ITR फाईल करण्याची शेवटची तारीख काय?

इन्कम टॅक्स कायद्यातील नियमानुसार, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) घटकातील करदात्यांना त्यांच्या बॅंक खात्याचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसल्यास, त्यांच्यासाठी आयटीआर रिटर्न फाईल (ITR Return File) करण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै, 2023 आहे.

कलम 92E अंतर्गत अहवाल दाखल करणाऱ्यांसाठी ITR रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख काय आहे?

ज्या करदात्यांनी एखाद्या विशिष्ट आर्थिक वर्षात आंतरराष्ट्रीय व्यवहार केले असतील. त्यांना कलम 92E अंतर्गत अहवाल सादर करणं आवश्यक आहे. अशा करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर, 2023 आहे.

उशिरा आयटीआर भरणाऱ्यांसाठी अंतिम मुदत काय आहे?

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर टॅक्स पेअर (Tax Payer) विलंब शुल्कासर आयटीआर रिटर्न दाखल करू शकतात. अशा करदात्यांसाठी म्हणजे उशिरा आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर, 2023 आहे.

शेवटच्या तारखेनंतर आयटी रिफंडचा दावा कसा करायचा?

आयटीआर फाईल करतानाच इन्कम टॅक्स परताव्याचा दावा केला जातो. पण जर तुम्ही मुदतीनंतर ITR भरत असाल तर त्या असेसमेंट वर्षाच्या 31 डिसेंबरपर्यंत रिफंडचा दावा करू शकता. इन्कम टॅक्स कायद्यामध्ये दंडात्मक सुधारणा केल्यानुसार, अंतिम मुदतीनंतर ITR दाखल करण्यासाठी 5 हजार रुपये दंड आकारला जातो. पण जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्या करदात्याकडून 1 हजार रूपये दंड आकारला जाईल.


ITR फायलिंगचे महत्त्व (ITR Filing Importance)

जर तुम्हाला पगारातून एका वर्षात 50 लाख रूपयांपर्यंत उत्पन्न मिळत असेल. तसेच तुमचे स्वत:चे राहते घर आहे आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत ही आहेत. तर तुम्हाला 31 जुलैच्या (i.e ITR filing last date) अगोदर ITR-1 फॉर्म भरणं गरजेचं आहे. तुम्ही ऑनलाईनही ITR फाईल (Online ITR Filling) करू शकता. यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून ITR फाईल करता येईल.

आयटीआर ऑनलाईन फाईल करण्याची प्रक्रिया टप्प्यानुसार समजून घेऊ. (ITR Filing Online Process Step by Step)

1. सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून लॉग-इन करा.

income-tax-login-page.png

2. लॉगिन केल्यानंतर E-File मध्ये जा आणि इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट करा.

3. मेन्यूमधून फाईल इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट करा.

4. आर्थिक वर्ष 2022-23 निवडा.

5. मोड ऑफ फायलिंग ऑप्शनमध्ये ऑनलाईन पर्याय (Online ITR Filling) निवडा.

ITR e-Filing 2022

6. अप्लिकेशन स्टेटसमध्ये individual पर्याय निवडा आणि नंतर ITR-1 पर्याय निवडा.

ITR Filing 2022

7. त्यानंतर Let’s get Started वर क्लिक करा.
8. ITR फायलिंग (ITR Filing) करण्याचे संयुक्तिक कारण निवडा आणि Continue Option वर क्लिक करा.

ITR Filing-1 2022


9. त्यानंतर तुम्हाला 5 फॉर्मस वॅलिडेट करावे लागणार आहेत. यामध्ये वैयक्तिक माहिती, एकूण उत्पन्न, एकूण वजावट, टॅक्स लायबिलिटी यांचा समावेश आहे. ही सर्व माहिती तुम्हाला Let’s validate your pre-filled return ऑप्शनद्वारे वॅलिडेट करावी लागणार आहे.

image-4.png

10. त्यानंतर Return Summary वर जाऊन सर्व 5 फॉर्मस किंवा टॅब्स कन्फर्मचे टीकमार्क दाखवत आहे की नाही ते तपासा. 5 टॅब्स कन्फर्म झाल्यानंतर Proceed वर क्लिक करा.
11. टॅक्स समरीमध्ये जाऊन तुम्ही टॅक्स Nil, Payable and Refund आहे का? हे पाहू शकता.
12. त्यानंतर डिक्लेरेशन टॅबवर जाऊन विचारलेली माहिती द्या आणि Preview Return ऑप्शनवर क्लिक करा.
13. त्यानंतर Proceed to Validation या पर्यायावर क्लिक करा. जर तुम्हाला कुठली माहिती योग्य वाटत नसेल तर तुम्ही ती दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्हाला Edit या पर्यायाचा वापर करावा लागेल.
14. ITR योग्य पद्धतीने वॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला ते व्हेरिफाय करावं लागणार आहे. हे तुम्ही आधार ओटीपी, नेट बॅंकिंगद्वारे ऑनलाईन करू शकता. तुम्ही ही प्रक्रिया ऑनलाईनसुद्धा करू शकता. ऑफलाईन व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला ITR-V चे प्रिंटआऊंट काढून त्यावर सही करून ते बंगळुरू येथील इन्कम टॅक्स विभागाकडे 120 दिवसांच्या आत पोस्टाने पाठवावे लागेल.