Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IT Layoff's : दोनशेपेक्षा जास्त IT कंपन्यांकडून 68 हजार कर्मचाऱ्यांना 'नारळ'; आणखी कर्मचारी कपातीची शक्यता

It company's layoff

सर्वेक्षणानुसार, निम्म्याहून अधिक व्यावसायिक क्षेत्रांना पुढील वर्षी मंदीचा धोका 50 टक्के किंवा त्याहून अधिक आहे, याचा अर्थ 2023 मध्ये अधिक टाळेबंदी (Financial Lockout) होण्याची शक्यता आहे.तंत्रज्ञान उद्योगात काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2023 कठीण होता. वर्षाची सुरुवात कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच खूप वाईट झाली आहे. काही दिग्गज कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना (Layoff) काढून टाकले आहे .

Microsoft, Amazon, Spotify, Google सारख्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांसह जगभरात चालू असलेल्या टाळेबंदीमध्ये सामील झाल्यामुळे, या महिन्यात जागतिक स्तरावर दररोज (सरासरी) सुमारे 3,400 टेक कर्मचार्‍यांना कामावरून काढले जात असल्याची नोंद झाली आहे.
लेऑफ ट्रॅकिंग साइट Layoffs.fyi च्या डेटानुसार, सुमारे 219 कंपन्यांनी जानेवारी 2023 मध्ये (आतापर्यंत) 68,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठी कर्मचारी कपात 

2022 यावर्षी, 1,000 पेक्षा जास्त कंपन्यांनी 154,336 कामगारांना कामावरून काढून टाकले. लेऑफ ट्रॅकिंगच्या डेटानुसार. 2022 ची मास टेक टाळेबंदी नवीन वर्षातही सुरू झाली आहे. जागतिक आर्थिक मंदी आणि मंदीच्या भीतीने बरखास्तीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 2023 मध्ये सुरुवाती  टाळेबंदी करण्यात येत आहे कारण बहुतेक व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांनी भाकीत केले आहे की त्यांच्या कंपन्या येत्या काही महिन्यांत वेतन कमी करतील .कोविड महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ही पहिलीच वेळ आहे की काही मोठ्या उद्योजकांनी त्यांच्या फर्ममध्ये नोकऱ्या कमी होण्याची अपेक्षा केली आहे.

मायक्रोसॉफ्ट गुगल यांसारख्या मोठ्या कंपन्यांना टाळेबंदीची झळ

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोठ्या टेक कंपन्या सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीच्या हंगामात सामील झाल्यामुळे, भारतासह जगभरात जानेवारीमध्ये सरासरी दररोज सुमारे 3,000 टेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे.