Worst IPO in India : आयपीओ – इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO-Initial Public Offering) हा एक प्रकारचा सार्वजनिक ऑफरचा प्रकार आहे. या पद्धतीद्वारे नवीन कंपन्यांचे म्हणजे ज्या कंपन्या मार्केटमधून उतरून सार्वजनिकरीत्या निधी जमा करू इच्छित आहेत. अशा कंपन्या आपल्या मालकीचे शेअर्स संस्थात्मक तसेच किरकोळ म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी ऑफर करतात. एखाद्या कंपनीचा आयपीओ बाजारात आला की, ती प्रायव्हेट लिमिटेड असलेली कंपनी आयपीओमुळे सार्वजनिक कंपनी बनते. आयपीओ विकत घेण्यासाठी काही नियम आहेत. त्याचे लॉट, इश्यूस आणि प्राईस बॅण्ड ठरलेले असतात. त्यामुळे तो लिमिटेड लोकांसाठी उपलब्ध होतो.
एकदा आयपीओचे (IPO) मार्केटमध्ये लिस्टिंग झाले की, त्याचे रूपांतर शेअर्समध्ये होते आणि या शेअर्सची खुल्या बाजारात विक्री खरेदी-विक्री केली जाते. या प्रक्रियेला फ्री फ्लोट म्हणतात. तर अशा पद्धतीने अनेक कंपन्या आपला आयपीओ बाजारात आणत असतात. या आयपीओंना बाजारातून भांडवल उभे करायचे असते. पण बऱ्याचदा काही आयपीओंचे मार्केटमध्ये चांगले लिस्टिंग होते. तर काही आयपीओंची कामगिरी खूपच वाईट ठरते. तर आज आपण 2022 या वर्षातील आणि इतर ज्या कंपन्यांच्या आयपीओंचे नुकसान (Worst Performing IPO’s) झाले आहे. अशा कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
वाईट कामगिरी करणारे भारतातील IPO!
ज्या कंपन्यांचे आयपीओ (IPO) गाजावाजा करत बाजारात आले. पण त्यांचे लिस्टिंग मात्र खूप वाईट झाले, अशा आयपीओंबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Life Insurance Corporation-LIC)
एलआयसीचा आयपीओ हा 2022 मधील सर्वांत मागणी असलेला आयपीओ होता. या आयपीओकडून सरकारपासून सर्वसामान्यांनाही खूप अपेक्षा होत्या. याच्यासाठी 7.3 दशलक्ष अर्ज आले होते. त्यामुळे हा 2.95 पटीने ओव्हरसब्स्क्राईब झाला होता. पण अखेर या आयपीओने सर्वांचीच निराश केली. याचा प्रति शेअर प्राईस 902-949 होती. लिस्टिंगच्यावेळी याची किंमत 80 रुपयांनी कमी झाली आणि आता तो 627 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.
2. झोमॅटो (Zomato)
झोमॅटोच्या आयपीओच्या किमतीच्या तुलनेत त्याच्या शेअर्सची चांगली लिस्टिंग झालेली असली तरी, लिस्टिंग झाल्यानंतर याच्या किमतीत सातत्याने घसरण दिसून आली. सध्या झोमॅटोचा शेअर्स 63.70 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. झोमॅटो आयपीओची किंमत 76 रुपये होती आणि याची लिस्टिंग प्राईस 125 रुपये होती. मधल्या काळात म्हणजे जुलैमध्ये हा 41 रुपयांपर्यंत खाली आला होता. झोमॅटो ही कंपनी सध्या तोट्यामध्ये आहे.
3. पेटीएम (Paytm-One 97 Communication Ltd)
पेटीएमच्या आपीओची किंमत 2150 रुपये होती. पण याची लिस्टिंग मात्र किंमत 1955 रुपयांवर झाली. लिस्टिंगनंतरही याच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. वर्षभरात याच्या शेअर्समध्ये 1269 रुपयांची घसरण झाली. सध्या पेटीएमचा शेअर 467 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.
4. स्टार हेल्थ इन्शुरन्स (Star Health Insurance)
स्टार हेल्थ इन्शुरन्स ही एक भारतीय बहुराष्ट्रीय आरोग्य विमा कंपनी (Indian Multinational Health Insurance Company) आहे. याच्या आयपीओची किंमत 900 रुपये निश्चित करण्यात आली होती. पण याचे ओपनिंग 903 रुपयांवर झाले. म्हणजे आयपीओच्या किमतीपेक्षा लिस्टिंग किमान 3 रुपयांनी वाढले. पण त्यानंतर मात्र त्यात सतत घसरण पाहायला मिळाली. जुलै 2022 मध्ये तो 475 रुपयांपर्यंत खाली आला होता. सध्या तो 646 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.
5. श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेड (Sriram Properties Ltd)
श्रीराम प्रॉपर्टीज हा श्रीराम ग्रुपचाच एक भाग आहे. या ग्रुपची स्थापना 1995 मध्ये झाली होती. याच्या IPOची किंमत 118 रुपये होती आणि हा 94 रुपयांवर लिस्टिंग झाला होता. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे तो आणखी खाली आला आणि सध्या 74 रुपयांवर तो ट्रेडिंग करत आहे.