Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railway : ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये सूट मिळणार!

Indian Railway

Image Source : www.en.wikipedia.org.com

रेल्वेने प्रवास करणाऱ्या (Travelling by Train) ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविडमुळे बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा सुरु होऊ शकते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या (Travelling by Train) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सूटबाबत बरीच माहिती दिली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, भारतीय रेल्वे लवकरच कोविडमुळे बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक सवलत पुन्हा सुरु करू शकते. रेल्वे मंत्रालयाने राज्यसभेत सांगितले की, स्थायी समितीने किमान स्लीपर आणि 3 श्रेणीच्या एसीमधील ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा आढावा घेण्याचा आणि विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावरील सवलत बहाल करावी, अशी शिफारस संसदीय समितीने केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले की भारतीय रेल्वेने 2019-20 मध्ये प्रवासी तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे, जी प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सरासरी 53% सवलत आहे.

नियमांमध्ये बदल होऊ शकतात

रेल्वे बोर्डाने सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना सवलती देण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीचे अनुदान कायम ठेवून या सवलतींचा खर्च कमी करण्याचा विचार आहे. आत्तापर्यंत, अद्याप कोणत्याही अटी आणि शर्तींवर निर्णय घेतलेला नाही.

53 टक्के सूट उपलब्ध 

रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना भाड्यात सरासरी 53 टक्के सवलत मिळते. यासोबतच दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांना या सूटशिवाय अनेक प्रकारच्या सवलती मिळतात.

कोणत्या वर्गात सवलत दिली जाईल?

राज्यसभेत रेल्वे मंत्र्यांना रेल्वे सवलतीबाबत विचारण्यात आले की, रेल्वे पुन्हा रेल्वे तिकिटावर सवलत देणार का? यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2019-20 मध्ये रेल्वेने प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. याशिवाय स्लीपर आणि थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत देण्याची सूचना संसदेशी संलग्न स्थायी समितीने केली आहे.