Railway Minister Ashwin Vaishnav: भारतीय रेल्वेच्या करोडो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कन्फर्म तिकीट बुक करताना लोकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने आता मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसह अधिकाधिक लोकांना कन्फर्म रेल्वे तिकीट देण्यासाठी रेल्वे काय करणार आहे, याची माहिती स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आपल्या नवीन योजनेत, भारतीय रेल्वेने आता तिकीट जारी करण्याची क्षमता 25000 वरून 2.25 लाख प्रति मिनिट आणि चौकशी क्षमता 4 लाख वरून 40 लाख प्रति मिनिट वाढवण्याचा विचार करत आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सादर केला योजनेचा रोडमॅप
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांद्वारे ही आनंदाची आणि महत्त्वाची माहिती रेल्वे प्रवाशांना दिली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 2023-24 या आर्थिक वर्षात 7000 किमीचे नवीन रेल्वे ट्रॅक (Railway Tracks) टाकण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. देशातील 2,000 रेल्वे स्थानकांवर 24 तास 'जन सुविधा' स्टोअर्स (Jan Suvidha Stores) सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.
25 हजार के आसपास टिकटिंग की कैपेसिटी है सिस्टम में, उसको 2,25,000 टिकिट्स प्रति मिनट की कैपेसिटी पर लेकर जाना है: माननीय रेल मंत्री श्री @AshwiniVaishnaw #AmritKaalBudget #Budget2023 pic.twitter.com/EnKDzxJD1O
— Ministry of Railways (@RailMinIndia) February 3, 2023
रेल्वेमंत्री म्हणाले की, 'प्रवासी आरक्षण प्रणालीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आमची योजना आहे. सध्या प्रति मिनिट सुमारे 25,000 तिकिटे काढण्याची रेल्वेची क्षमता आहे. ही क्षमता प्रति मिनिट 2.25 लाख तिकिटांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले. वैष्णव पुढे म्हणाले, 'चौकशीची क्षमताही प्रति मिनिट चार लाखांवरून 40 लाख प्रति मिनिट केली जाईल. चालू आर्थिक वर्षात 4500 किमी (प्रतिदिन 12 किमी) रेल्वे ट्रॅक टाकण्याचे लक्ष्य आधीच गाठले गेले आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
राजधानी, शताब्दी आणि दुरांतोमध्ये 'फ्लेक्सी' भाडे
मंत्री म्हणाले की राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांमध्ये 'फ्लेक्झी' भाडे (Flexible Rate) लागू करण्यात आले असून सध्या 144 गाड्यांमध्ये 'फ्लेक्झी' भाडे लागू आहे. ते म्हणाले की, 'फ्लेक्सी' भाडे योजनेची व्याप्ती वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. मंत्री म्हणाले की 2017-18 ते 2021-22 या पाच वर्षांमध्ये 'फ्लेक्सी' भाड्यातून मिळालेले अतिरिक्त उत्पन्न सुमारे 3,357 कोटी रुपये इतके आहे.