Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Premier League :  मुंबई इंडियन्स ठरली सगळ्यात जास्त मूल्यांकन असलेली आयपीएलमधली टीम

Mumbai Indians

Image Source : www.kheltalk.com

Indian Premier League : आयपीएल स्पर्धेचा आकार दिवसें दिवस वाढतोय. आणि यावर्षी स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेऊन दाखवली. आता आयपीएलची एक यशस्वी टीम मुंबई इंडियन्स स्पर्धेतली सगळ्यात वजनदार टीम ठरलीय.

लोकप्रियता आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद गृहित धरला तर इंडियन प्रिमिअर लीग (IPL) देशातली सगळ्यात मोठी क्रीडा स्पर्धा (Biggest Sporting Event) आहे. आणि 2009 मध्ये स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून स्पर्धेची व्याप्ती आणि तिची वार्षिक उलाढाल (Yearly Turnover) दरवर्षी वाढली आहे. यावर्षी तर स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची झेप घेतली.   

स्पर्धेच्या या यशाचा फायदा सहभागी टीमनाही मिळतोय. आणि टीमची ब्रँड व्हॅल्यू (Brand Value) वाढतेय. यात सगळ्यात पुढे आहे नीता अंबानी (Neeta Ambani) आणि रिलायन्स समुहाच्या (Reliance) मालकीची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही टीम. सध्या रोहीतन शर्मा कर्णधार असलेल्या या टीमने आतापर्यंत पाचदा ही स्पर्धा जिंकलीय. आणि आता या टीमचं ब्रँड मूल्य सर्वाधिक 8.3 कोटी अमेरिकन डॉलरच्या घरात जाऊन पोहोचलंय.    

ब्रँड फिनान्स या कंपनीने यासाठीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2021 च्या तुलनेत मुंबई इंडियन्सच्या ब्रँड मूल्यात 4% ची वाढ झाली आहे.   

most-valuable-ipl-brands-2022.jpg
 आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क आता टीव्ही बरोबरच डिजिटल माध्यमांवरही वेगळे विकले जातात. आणि दोन्हीचा आकडा विश्वविक्रमी असतो. ही मिळकत वाढल्यामुळेच स्पर्धेचं आणि टीमचं ब्रँड मूल्य वाढलं आहे.    

मुंबई इंडियन्सच्या खालोखाल कोलकाता नाईट रायडर्स टीमचं ब्रँड मूल्य 7.7 कोटी रुपये इतकं आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे चेन्नई सुपर किंग्जची टीम. त्यांचं ब्रँड मूल्य 7.36 कोटी रुपये इतकं आहे. पण, चेन्नई टीमच्या मूल्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 6% ची घट झालीय. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या नव्या टीम अपेक्षेप्रमाणेच या तालिकेत खालच्या क्रमांकांवर आहेत.    

मुंबई इंडियन्सनी 2013 मध्ये सचिन तेंडुलकरच्या कप्तानीत पहिल्यांदा आयपीएल चषक उंचावला. आणि त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहीत शर्माच्या कप्तानीत आणखी चारदा हा चषक जिंकला आहे. सचिन तेंडुलकर बरोबरच कायरन पोलार्ड, लसिथ मलिंगा रिकी पाँटिंग अशा स्टार खेळाडूंनी टीमचं नेतृत्व केलंय.    

मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधली नफा कमावायला लागलेलीही पहिली फ्रँचाईजी टीम आहे.