Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL Auction 2022 : Cameroon Green साठी मुंबई इंडियन्सनी मोजले 17.50 कोटी रुपये

Cameroon Green

Image Source : www.cricketaddictor.com

IPL Auction 2022 : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर Cameroon Green स्पर्धेच्या इतिहासातला दुसरा महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सनी त्याला 17.50 कोटी रुपये देऊन खरेदी केलंय.

आयपीएल लिलाव 2022 (IPL Auction 2022) नेहमीसारखाच मोठ मोठ्या रकमा आणि नवीन विक्रमांचा ठरतोय. सॅम कुरान (Sam Curran) , कॅमेरून ग्रिन (Cameroon Green) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या टी-20 स्पेशालिस्ट (T-20 Specialist) समजल्या जाणाऱ्या खेळाडूंनी लिलावाचा पहिला दिवस गाजवलाय. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर (Australian Allrounder) कॅमेरून ग्रिन (Cameroon Green) स्पर्धेच्या इतिहासातला दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.     

मुंबई इंडियन्स टीमने (Mumbai Indians) त्याला 17.50 कोटी रुपयांत विकत घेतलं. मुंबईने यापूर्वी सर्वात महागडा ठरलेला सॅम कुरानसाठीही बाजी लावली होती. पण, शेवटच्या क्षणी किंग्ज इलेव्हन पंजाब टीमने कुरानला 18.25 कोटी रुपये ही आजची सर्वात जास्त बोली लावून विकत घेतलं. त्यानंतर काही वेळाने कॅमेरुन ग्रीन विक्रीसाठी आला. आणि तेव्हा मुंबईने ही संधी हातची जाऊ दिली नाही.     

कॅमेरुन ग्रिन मागच्या सहा महिन्यांच्या काळात टी-20 क्रिकेटमध्ये चांगलाच गाजतोय. सुरुवातीला तो ऑस्ट्रेलियन टीममध्ये नियमित खेळाडू नव्हता. पण, ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात दोन टी-20 मॅचमध्ये हाफ सेंच्युरी करत त्याने 112 रन केले होते. आणि यात त्याचा स्ट्राईक रेट 214 रनचा होता. शिवाय तो वेगवान माराही करू शकतो.     

भारत दौऱ्यातली त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन टी-20 टीमचा तो नियमित भाग झाला. साधारणपणे तो टॉप ऑर्डरला बॅटिंग करतो. पण, कुठल्याही क्रमांकावर बॅटिंगला येऊन तो भराभर रन करू शकतो, ही त्याची खासियत आहे. आणि त्याचा बोलिंगचा वेगही आश्वासक आहे. त्यामुळेच या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई टीमने त्याच्यासाठी बोलीवर बोली लावल्या.     

लिलावात मिळालेल्या यशावर विश्वासच बसत नाहीए अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी स्वत:ला सारखा चिमटा काढतोय. कारण, विश्वासच बसत नाहीए. लिलाव मी ऑनलाईन बघत होतो. माझ्यावर माझ्यासमोर बोली लागत होती. आणि हे पाहताना रोमांचक वाटत होतं. आयपीएल मध्ये पहिल्यांदा खेळताना मी उत्साही आहे,’ असं कॅमेरुन ग्रिन म्हणाला आहे.