Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Career Tips : बारावीनंतर लवकरात लवकर कमाई करायची आहे, तर तुम्ही करू शकता 'हे' 5 बेस्ट कोर्स

Best Courses After 12th

Best Courses After 12th : तुम्हाला जर बारावी नंतर लवकरात लवकर नोकरी पाहिजे असेल किंवा कमाई करायची असेल तर काही कोर्स करून तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. 'या' 5 कोर्सला अप्लाय करू शकता.

Best Courses After 12th : करिअरच्या स्टेपमधील दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे बारावी. बारावीनंतर काय करावे? हा प्रश्न अनेकांना पडतो. काही मुलांचे आधीच ठरलेले असते, की समोर काय करायचे पण काही मुलं परिस्थितीनुसार समोरील पाऊल उचलतात. तुम्हाला जर बारावी नंतर लवकरात लवकर नोकरी पाहिजे असेल किंवा कमाई करायची असेल तर काही कोर्स करून तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता. ‘या’ 5 कोर्सला अप्लाय करू शकता.

इंटिरिअर डिझाइनिंग

एखाद्याला लहानपणापासूनच डिझाइन आणि पेंटिंगची आवड असते. ती आवड जोपासून तुम्ही त्यात करिअर करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंटिरिअर डिझाइनिंगमध्ये डिप्‍लोमा करावा लागेल. हा शॉट टर्म डिप्‍लोमा आहे. त्यानंतर तुम्ही महिन्याला 20 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

वेबसाइट किंवा सॉफ्टवेअर ॲप

तुमची बारावी सायन्समध्ये झाली असेल आणि तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, वेबसाइट किंवा सॉफ्टवेअर ॲप बनविण्यात चांगले करिअर घडवू शकता. त्यासाठी विविध प्रकारचे डिप्लोमा आहेत. त्यात अप्लाय करून तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि लवकरात लवकर नोकरी मिळवू शकता. यामध्ये सुद्धा तुम्ही दरमहा  20 हजारांपर्यंत कमाई करू शकता. 

ॲनिमेशन आणि मल्‍टिमीडिया

ॲनिमेशन आणि मल्‍टिमीडियामध्ये जर तुम्हाला इंटरेस असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. कारण आता याला खूप डिमांड आहे. याचे कोर्सेस खूप महाग असतात पण तुम्हाला आवडत असेल तर करिअरसाठी तुम्ही हा पर्याय निवडू शकता. यामध्ये सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळू शकतो आणि त्यातून तुम्ही 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत महिना कामवू कमवू शकता. 

योगा टीचर 

लहान असतांना शाळेमध्ये आठवड्यातून एक दिवस योगा घ्यायचे, त्यात अनेकांना मार बसायचा. कारण योगा हा ज्याला आवड आहे आणि प्रॅक्टिस आहे त्यालाच जमतो. पण, ज्याला जमेल त्याच्यासाठी योगा हा करिअरसाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. योगामध्ये करिअर करायचे असल्यास तुम्हाला कोर्ससोबतच प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. कोर्स केल्यानंतर तुम्ही जॉब करून  महिन्याला 15 ते 20  हजार रुपये कमावू शकता.

फिटनेस इन्स्ट्रक्टर

सध्याच्या काळात फिटनेस खूप महत्वाची झाली आहे. अनेक तरुण तरुणीचा कल जिमकडे दिसून येत आहे. अशात तुम्ही फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू शकता. जर तुम्हाला यात करिअर करायचे आहे, तर 6 ते 8  महिन्यांचा कोर्स करून तुम्ही जिममध्ये ट्रेनर इन्स्‍ट्रक्‍टर म्हणून काम करू शकता. यातून तुम्ही दरमहा 15 ते 20 हजार रुपये महिना कमावू शकता.