Career Tips: वाशिम जिल्हातील एकता राठोड सध्या गांधी फेलोशिपला आहे. उमरी खुर्द या छोट्या खेड्यातून बाहेर पडण्याच आणि यशाच्या शिखरावर पोहचण्याच श्रेय एकता एकलव्य फाऊंडेशनला देते. जेव्हा एकताला प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नव्हत तेव्हा एकलव्य फाऊंडेशनमधील प्रशांत शेंडे यांनी तिला मार्गदर्शन करून पाठिंबा दिला.
फेलोशिपला नंबर लागल्यानंतर तिला गुजरात लोकेशन आले आणि घरच्यांनी तिथे जाण्यास नकार दिला तेव्हा सुद्धा एकलव्य मधील सहकाऱ्यांनी घरच्यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. आणि एकता आज स्वकमाईने पुढील शिक्षण घेत आहे.
एकताप्रमाणे आणखी काही असे मुलं मुली आहेत, ज्यांचे आयुष्य एकलव्य फाऊंडेशनच्या मदतीने सुरळीत झाले आहे. त्यांना यशाची शिखरं गाठण्यात एकलव्य फाऊंडेशनचा मोठा वाटा आहे. हे फाऊंडेशन महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील राजू केंद्रे यांचे आहे. छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजातील कुटुंबामध्ये जन्मलेला राजू आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आपले नाव उज्वल करत आहे.
राजू यांच्या आई-वडिलांचे शिक्षण खूप कमी. आणि राजू यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालेल. त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आणि ग्रामविकास चळवळीला सुरुवात केली.
एकलव्य ही एक चळवळ आहे ज्याचा उद्देश दर्जेदार शिक्षणाच्या संधी, ग्रामीण भागातील तरुणांमध्ये नेतृत्व क्षमता आणणे. उच्च शिक्षणांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे. तुमच्या पिढीतील पहिल्या शिकणाऱ्यांना प्रीमियर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट (HEI) आणि डेव्हलपमेंट फेलोशिपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याचे काम यामध्ये केले जाते.
गेल्या 5 वर्षात यांच्या माध्यमातून 750+ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि प्रतिष्ठित फेलोशिप TISS, APU, IITs, केंद्रीय विद्यापीठे, ISDM, गांधी फेलोशिप, टीच फॉर इंडिया फेलोशिप, गुंज फेलोशिप, SBI YFI फेलोशिप मिळाल्या आहेत.
आईला कॅन्सर आणि बाबा नसतांना ओमने गाठला लांबचा प्रवास
नयन सोमकुवर एकलव्य फाऊंडेशनच्या मदतीने मिळालेल्या स्कॉलरशिपमुळे आज पुण्याला शिक्षण घेत आहे. तिला दरमहा 4400 रुपये स्कॉलरशिप मिळते. एकलव्य फाऊंडेशनने डोनर शोधून हिला स्कॉलरशिप मिळवून दिली. नयन गेले 7 महीने या स्कॉलरशिपचा लाभ घेत आहे.
ओम नवले पुण्याला शिक्षण घेत आहे. महामनिशी बोलतांना ओम म्हणाला की, एकलव्य फाऊंडेशनमुळे मी आज शिक्षण घेऊ शकत आहे. आईला कॅन्सर आणि बाबा वारले, त्यामुळे मी पूर्ण खचून गेलो होतो. पण बुलढाणामध्ये झालेला एकलव्यचा वर्कशॉप माझ्यासाठी लकी ठरला. या सर्व बाबी प्रकाशदादा शेंडे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या मदतीने मला स्कॉलरशिप मिळू लागली आणि मी आज शिक्षण घेत आहे.
पवन काळे सध्या गांधी सूरतपुर छत्तीसगडला गांधी फेलोशिपला आहे. 2017 पासून मी एकलव्यसोबत जुळला आहे. 2019 मध्ये झालेला एकलव्यचा वर्कशॉप मी अटेंड केला आणि त्यात मिळालेल्या माहिती नुसार अनेक गोष्टी ट्राय केल्या, पण अपयश आले. त्यानंतर अथक परिश्रम आणि एकलव्य फाऊंडेशनचे मार्गदर्शन यातून मी आज गांधी फेलोशिपला आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि मदत दोन्ही करते.
महामनीशी बोलतांना नयन सांगतात की, एकलव्य फाऊंडेशनच्या मदतीने 8 मुलींना फेटे स्कॉलरशिप मिळत आहे. प्रत्येक मुलीला 4400 रुपये महिन्याला मिळते.