Career Tips: लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांना चित्र काढण्याची प्रचंड आवड असते. अक्षर ओळख होण्याअगोदरही आपण सगळे चित्रांवरून वस्तू ओळखायला लागतो. एवढी ताकद असते या चित्रांमध्ये. मला 'चित्रकार'(Painter) व्हायचंय हे आपण पहिलेलं पहिलं स्वप्न असतं. पण योग्य मार्गदर्शन(Guidance) आणि संधी न मिळाल्याने हे पहिलं स्वप्न(First Dream) मागे पडतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या क्षेत्राबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्हाला चित्र काढण्यात रस असेल आणि तुम्ही त्यामध्ये करिअर(Career) करू इच्छित असाल. तर आजचा हा लेख तुम्हा सर्वांसाठी.
या क्षेत्रात जम बसवण्यासाठी ड्रॉईंगचा सर्टिफिकेट कोर्सच्या(Certificate Course in Drawing) माध्यमातून करिअर बनवणे सोपे झाले आहे. यासाठी तुम्ही ड्रॉईंगचा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. ड्रॉइंग कोर्सची फी(Fees), कालावधी आणि त्याची भविष्यातील करिअरची व्याप्ती किती आहे चला जाणून घेऊयात.
ड्रॉइंग कोर्ससाठी पात्रता आणि कालावधी काय?
10वी आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही ड्रॉईंगमधील प्रमाणपत्र असलेल्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकता (12वी नंतरचे करिअर पर्याय). हा अभ्यासक्रम ऑनलाईन(Online) व ऑफलाईन(Offline) अशा दोन्ही माध्यमातून शिकता येतो. ऑफलाईन कोर्स करण्यासाठी 3 महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो. तर ऑनलाईन अभ्यासक्रम काही तासांपासून ते 1 वर्षात शिकता येतो.
तुम्ही ड्रॉइंग कोर्स मोफतही करू शकता?
ड्रॉईंग सर्टिफिकेट कोर्सचे ऑफलाईन आणि ऑनलाईन माध्यमांचे शुल्क(fees) वेगवेगळे असतात (Drawing certificate free course). काही सामाजिक आणि शैक्षणिक संस्था हा कोर्स मोफत सुद्धा पुरवितात. काही संस्थांमध्ये हा कोर्स 500 रुपयांपर्यंत उपलब्ध होतो. ऑफलाईन कोर्सची फी 4 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
'या' आहेत करियरच्या संधी
- कला शिक्षक (Teacher)
- चित्रकार(Painter)
- हास्य कलाकार(Comedian)
- कला दिग्दर्शक(Art director)
- म्युरलिस्ट(Muralist)
- भेट देणारा कलाकार(Visiting Artist)
- व्यावसायिक कलाकार(professional artist)
- चित्रकला अभियंता(Painting Engineer)