Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'Force Motors Trax Cruiser' च्या या 13 सीटर कारची किंमत किती? कोणते आहेत विशेष फीचर्स

Force Motors Trax Cruiser

Image Source : www.drivespark.com

Force Motors Trax Cruiser: मार्केटमधील 5 सीटर कारच्या किंमतीत 'Force Motors' ने 10 आणि 13 सीटर हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

Force Motors Trax Cruiser: एकत्र कुटुंब म्हंटल(Joint Family) की जास्त लोकंही आलीच. मग दरवेळी एकच समस्या. कुठेही एकत्र जायचे असेल, तर तुम्हाला नक्कीच मोठ्या वाहनाची गरज भासत असेल. अशा वेळी छोट्या कार  किंवा अगदी 7 किंवा 8 सीटर गाड्या सुद्धा तुमची ही गरज भागवू शकत नाहीत. अशा वेळी तुम्हाला ट्रॅव्हल बस(Travel Bus) शिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. आपल्या सगळ्यांच्या याच समस्येला लक्षात घेऊन 'Force Motors'ने त्यांची नवीन ट्रॅक्स क्रूझर (Force Motors Trax Cruiser) मार्केटमध्ये आणली आहे. यामध्ये 10 आणि 13 सीटर हे पर्याय उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊ या 13 सीटर कारबद्दल.

Force Motors Trax Cruiser कारची किंमत किती?

Force Motors Trax Cruiser च्या बेस मॉडेलची किंमत दिल्ली एक्स-शोरूममध्ये 16.08 लाख रुपये इतकी आहे. जी ऑन रोड जवळपास 18.00 लाख रुपयांपर्यंत मिळते. एकूण 4 प्रकारामध्ये हे वाहन बाजारात उपलब्ध आहेत.

Force Trax Cruiser मध्ये कोणते फीचर्स मिळतील?

  • Force Trax Cruiser मध्ये तुम्हाला 2596CC, 4 सिलेंडर, BS-VI, कॉमन रेल DI TCIC डिझेल इंजिन देण्यात आले आहे
  • 3200 rpm वर 66kW पॉवर आणि 1400-2400 rpm वर 250 Nm टॉर्क जनरेट आहे व  त्यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळत आहे 
  • 13 सीटर व्हर्जनमध्ये समोरच्या रांगेत (एक ड्रायव्हर), दुसऱ्या रांगेत 3 लोक बसण्यासाठी जागा देण्यात आली आहे, त्यानंतर मागील बाजूस समोरासमोर दोन अशा 4
  • सीट्स देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एकूण 8 लोक बसू शकतात. तिन्ही रांगांसह, गाडीमध्ये 13 लोक आरामात बसू शकतात
  • यामध्ये 10 सीटचा कॉन्फिगरेशन पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे

Force Motors Trax Cruiser ची प्रतिस्पर्धी कोण?

या किंमतीमध्ये बाजारात SUV कार उपलब्ध आहेत ज्या 5 सीटर पर्यायामध्ये येतात. पण त्याच किमतीत तुम्हाला 13 सीटरचा पर्याय Force Motors ने उपलब्ध करून दिला आहे. या कारचा प्रतिस्पर्धी म्हणून टाटाच्या टाटा विंगरकडे( TATA WINGER) पाहिजे जात आहे. ज्यामध्ये 2.2L डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 350 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 10 आणि 13 सीटर पर्यायांमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.