प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे कार (Dream Car) घेण्याचे स्वप्न असते. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाताना आपल्याकडेही कार असावी असे प्रत्येकालाच वाटते मात्र बजेट अभावी प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. तुमच्या याच समस्येचा तोडगा म्हणून आजच्या लेखात आपण 5 लाख रुपयांमध्ये कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या वाहनांची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला या कार एक्स शोरूम किंमतीसह 5 लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतील. कोणत्या आहेत या कार जाणून घेण्यासाठी वाचत राहा.
Table of contents [Show]
Renault Kwid
तुम्हाला ‘ रेनॉल्ट क्विड ’ (Renault Kwid) ही कार 5 लाखांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत आहे. या कारमध्ये तुम्हाला 800 सीसी इंजिन मिळत आहे. ही कार तुम्हाला 4,64,400 रुपये (एक्स – शोरूम,दिल्ली) इतक्या किंमतीमध्ये मिळेल.
PMV EaS E
नुकतीच ‘PMV’ ने इलेक्ट्रोनिक वाहन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Electric Car) प्रस्तुत केली आहे. या कारची किंमत 4,79,000 रुपये(एक्स – शोरूम) आहे. या कारमध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, रिमोट पार्क असिस्ट, क्रुझ कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टीव्हिटी, ऑनबोर्ड नेव्हिगेशन यासारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
Maruti Suzuki Alto 800
मारुती सुझुकी ही देशातील सर्वच ग्राहकांची पहिली पसंती आहे असे म्हणायला काही हरकत नाही. या कारच्या यादीत सर्वात स्वस्त कार म्हणून ‘Maruti Suzuki Altro 800’ हिला ओळखले जाते. या कारची किंमत 3,39,000 रुपयांपासून (एक्स – शोरूम) सुरु होते. या कारमध्ये 800 सीसी इंजिन देण्यात आले असून ही कार 22.5 Kmpl मायलेज देते.
Maruti Suzuki Altro K10
मारुती सुझुकी ‘Altro K10’ ही कार देखील परवडणाऱ्या वाहनाच्या यादीत समाविष्ट होते. या कारची किंमत 3,99,000 (एक्स – शोरूम) इतकी आहे. या कारमध्ये 998 सीसीचे इंजिन देण्यात आले असून या कारमध्ये तुम्हाला डिजिटल स्पीडोमीटर (Digital Speedometer) देखील मिळत आहे.
Maruti S Presso
तुम्हाला ‘Maruti S Presso’ हे मॉडेल देखील 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळेल. या कारमध्ये कंपनीने 998 सीसीचे इंजिन दिले आहे. या कारची किंमत 4,25,000 रुपये(एक्स -शोरूम, दिल्ली) पासून सुरु होते. या कारमध्ये तुम्हाला apple कार प्ले आणि अँड्राँईड ऑटो सारखे फीचर्स मिळत आहेत.