FIFA World Cup 2022 Prize Money: नुकताच FIFA World Cup 2022 पार पडला. फिफा विश्वचषक(FIFA World Cup) जिंकून अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीने (Lionel Messi) एक विश्वविक्रम केला आहे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही तिसरी वेळ असून याआधी अर्जेंटिनाने 1978 व 1986 साली विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनाने विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले आहे. कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनाने (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभव केला आणि फिफाच्या विश्वचषकावर स्वतःचं नाव कोरलं.
जगातील सर्वात लोकप्रिय खेळांमध्ये फुटबॉलला विशेष स्थान आहे. त्यामुळेच तर संपूर्ण जगाचे लक्ष FIFA World Cup 2022 कडे लागले होते. तुम्हाला माहित आहे का? विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला कोट्यवधी रुपयांची प्राईज मनी तर मिळतेच पण यासोबत स्पर्धेत सामील झालेले आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघानाही बक्षीस आणि प्राईज मनी दिली जाते. केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघांनाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही फिफाकडून बक्षीस म्हणून काही रक्कम दिली जाते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या संघाला फिफा विश्वचषकात किती प्राईज मनी मिळाली.
कोणत्या संघाला किती प्राईज मनी मिळाली?
- विजेती टीम 'अर्जेंटीना': 347 कोटी रुपये
- उपविजेती टीम 'फ्रान्स': 248 कोटी रुपये
- तिसऱ्या क्रमांकाची टीम 'क्रोएशिया' : 223 कोटी रुपये
- चौथ्या क्रमांकाची टीम 'मोरक्को': 206 कोटी रुपये मोरक्को
सहभागी होणाऱ्या संघांना FIFA कडून किती रक्कम देण्यात येते?
- विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला 9-9 मिलियन डॉलर (दशलक्ष डॉलर्स) देण्यात येतात
- प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांसाठी 13 मिलियन डॉलर्स इतकी बक्षीस रक्कम देण्यात येते
- क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांसाठी 17 मिलियन डॉलर्स रक्कम देण्यात येते
FIFA World Cup 2022 साठी एकूण किती रक्कम खर्च करण्यात आली?
या स्पर्धे दरम्यान FIFA कडून एकूण 3641 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ही रक्कम सहभागी संघांना बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या रकमेमध्ये प्रत्येक संघाचा सहभाग, गोल शुल्क आणि विजेता संघ(Winning Team), उपविजेता संघ आणि बाद फेरीत पोहोचलेल्या संघांची रक्कम यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.