FIFA World Cup 2022 Prize Money: काल झालेली 'FIFA World Cup' स्पर्धा इतिहासातील कदाचित पहिलीच थरारक स्पर्धा असेल. 2014 साली FIFA World Cup चे भंगलेले स्वप्न पूर करण्याच्या निर्धाराने अर्जेंटिना संघ मैदानात उताराला आणि त्यांनी विजेत्या पदाच्या ट्रॉफीवर स्वतःच नाव कोरलं. अगदी अद्भुत आणि नयनरम्यच सोहळा होता तो. 'FIFA World Cup' जिंकणाऱ्या या संघाला ट्रॉफी आणि 42 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात सांगायचं तर 347 कोटी रुपये मिळाले. पण तुम्हाला माहिती आहे का? FIFA World Cup च्या विजेत्या पदाची Prize Money आत्तापर्यंत किती रुपयांनी वाढत गेली? यापूर्वी ती किती रुपये होती? चला तर आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.
2018 साली झालेल्या स्पर्धेत किती होती विजेतेपदाची रक्कम?
2018 साली झालेल्या FIFA World Cup स्पर्धेच्या तुलनेत 2022 मधील रक्कम 4 मिलियन डॉलर्सने वाढली आहे. त्यावेळी ही रक्कम 38 मिलियन डॉलर्स इतकी होती. तुम्हाला ठाऊक आहे का? 2006 पूर्वी FIFA World Cup विजेत्या संघांना कधीही 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मिळालेच नाहीत.
कोणत्या साली किती होती विजेते पदाची रक्कम?
अनु | वर्ष | विजेते पदाची रक्कम(डॉलर्स) |
1 | 2022 | $42m |
2 | 2018 | $38m |
3 | 2014 | $35m |
4 | 2010 | $30m |
5 | 2006 | $20m |
6 | 2002 | $8m |
7 | 1998 | $6m |
8 | 1994 | $4m |
9 | 1990 | $3.5m |
10 | 1986 | $2.8m |
11 | 1982 | $2.2m |