Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ किंवा पीपीएफ गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

EPF, PPF, Provident Fund , Investment

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ हा केवळ कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध आहे तर स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी पीपीएफ एक चांगला पर्याय ठरु शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 'ईपीएफओ'त आपला समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. ईपीएफओवरील व्याजदर दरवर्षी निश्चित करण्यात येतो. हा व्याजदर 7 ते 8.50 टक्क्यापर्यंत आहे. याचप्रमाणे एम्प्लॉयर किवा तुमची कंपनीही यात तुमच्या इतकाच आपला हिस्सा

ईपीएफ व पीपीएफ अर्थात इम्प्लॉयइज  प्रॉव्हीडंट फंड (Employees Provident Fund) आणि पब्लिक प्रॉव्हीडंट फंड (Public Provident Fund) हे दोन्ही भविष्यासाठी एकरकमी आणि  सुरक्षित परतावा देणारे म्हणून लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहेत. पण यापैकी कशात गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकदा गुंतवणूकदारांना पडतो. मात्र ईपीएफ हा केवळ कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध आहे तर स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी पीपीएफ एक चांगला पर्याय ठरु शकतो. 

‘ईपीएफ’ कुणासाठी ?

खरंतर हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (इपीएफ) हा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध नसतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO) ही संस्था सेवानिवृत्तीनंतर सदस्यांना मिळकतीची  सुरक्षा पुरवण्यासाठी अनेक योजना चालवते. कर्मचाऱ्यांची संख्या 20 पेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक कंपनीला ‘ईपीएफओ’मध्ये नोंदणी करावी लागते. यानंतर, मासिक वेतनातील एक विशिष्ट रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघेही जमा करतात. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीपर्यंत अथवा नोकरी सुरु असेपर्यंत ईपीएफओमध्ये दरमहा गुंतवणूक केली जाते. हा पर्याय केवळ कर्माचाऱ्यांसाठी असल्याने अर्थातच सर्वांसाठी उपलब्ध नसतो.

‘ईपीएफ’ अधिक फायदेशीर

ज्यांना शक्य आहे त्यांनी 'ईपीएफओ'त आपला समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. ईपीएफओवरील व्याजदर दरवर्षी निश्चित करण्यात येतो. हा व्याजदर 7 ते 8.50 टक्क्यापर्यंत आहे. याचप्रमाणे एम्प्लॉयर किवा तुमची कंपनीही यात तुमच्या इतकाच आपला हिस्सा जमा करते. एम्प्लॉयर जमा करत असलेल्या रकमेपैकी जवळपास दोन तृतीयांश इतका भाग ‘ईपीएस’मध्ये जमा होतो. पण निवृत्तीनंतर एक निश्चित मासिक उत्पन्न मिळून याचाही  अंतिमत: आपल्याला लाभ होतो. ज्यांना ‘ईपीएफ’ची सुविधा उपलब्ध आहे, त्यांच्यासाठी हाच पर्याय जास्त योग्य ठरतो. याच आणखी एक कारण म्हणजे मिळणाऱ्या व्याजाच्या दरातील फरक. ईपीएफला मिळणारे व्याज हे ‘पीपीएफ’पेक्षा जास्त असते.

‘पीपीएफ’ सर्वांसाठी उपलब्ध ही जमेची बाजू

यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हा पर्याय मात्र सर्वांसाठी उपलब्ध असतो. ही योजना सुद्धा ‘ईपीएफ’प्रमाणे भविष्यासाठी तरतूद करण्याचा हेतू साध्य करते. 'ईपीएफ'प्रमाणे ही योजना मर्यादित नाही. भारतीय नागरिक पीपीएफ खाते उघडू शकतो. कोणतीही व्यक्ती मग ती नोकरी करणार असेल किंवा  स्वयं रोजगार करत असेल तरीही ती या योजनेत सहभागी होऊ शकते. वर्षाला केवळ 500 रुपये भरुनसुद्धा  या योजनेत गुंतवणूक सुरु करता येते. शक्य असेल त्यावेळी नियमित पैसे भरून 15 वर्षानंतर तुमच्या भविष्यासाठी एक मोठी आर्थिक तरतूद किंवा निधी  तुम्ही निर्माण करू शकता. यात ‘ईपीएफ’पेक्षा कमी असेल तरीही  सामान्यत: 7 टक्के इतका व्याज मिळते.

महागाईवर मात करण्यास 'ईपीएफ' सक्षम

महागाईच्या दराचा विचार केला तर ‘पीपीएफ’वरील उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते अस म्हणता येणार नाही. महागाईपेक्षा किमान 1 ते 2 टक्के मिळणारे व्याज हे  तुलेनेने अधिक आहे. यामुळे भविष्यकाळात गुंतवणूकदाराची क्रयशक्ती कमी होत नाही. याच मुद्दयाचा विचार करता ‘ईपीएफ’ यापेक्षा सरस ठरते. अधिक व्याज मिळते शिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे इम्प्लॉयर देखील यात पैसे भरत असतो. यामुळे महागाई वाढीवर ‘पीपीएफ’पेक्षा ‘ईपीएफ’ अधिक मात करते. थोडक्यात, ईपीएफ ज्यांना शक्य असेल यांनी जरुर याचा लाभ घ्यावा. अन्य नागरिकांनी भविष्यात एकरकमी आणि सुरक्षित परताव्याचा विचार करुन ‘पीपीएफ’चा जरूर विचार करावा.