Employees Provident Fund : नोकरदार व्यक्तींसाठी प्रोव्हिडंट फंड हा बचतीचा एक चांगला पर्याय आहे. ऑर्गनाईझ सेक्टरमध्ये काम करणारे बहुतांश नोकरदार वर्ग हा EPFO चा सदस्य आहे. EPFO हे आजच्या तारखेला कोट्यवधीहून अधिक लोकांची खाती मॅनेज करत आहे. EPFOच्या खात्यामध्ये एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर या दोघांचा बेसिक आणि डिअरनेस आलाऊंस मिळून 24 टक्के हिस्सा त्यात जमा होतो. प्रत्येक वर्षी EPF खात्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेवर सरकार व्याज देते. सध्या सरकार या योजनेवर 8.1 टक्के व्याज देत आहे.
Table of contents [Show]
सेफ फंड तयार करणारा मदतनीस...
बऱ्याच लोकांना गुंतवणूक आणि बचत करताना EPF चे महत्त्व जाणवत नाही. त्यांनी जर EPF मधील पैशांना हात न लावता ते रिटायरमेंटपर्यंत तसेच ठेवले तर त्याचा एक खास फंड तयार होऊ शकतो. बऱ्याच लोकांना यावर मिळणारे व्याजाचे कॅलक्युलेशन कसे केले जाते. याची माहिती नसते. यात एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की, जी पीएफ खात्यामधील जी रक्कम पेन्शन फंडमध्ये जमा होते. त्यावर कोणतंही व्याज दिलं जात नाही.
Calculation : जर तुम्हाला 25व्या वर्षी 14 हजार पगार असेल तर...
वय : 25 वर्षे
बेसिक पगार + DA : 14,000 रुपये
निवृत्तीचे वय : 58 वर्ष
कर्मचाऱ्याचे मासिक योगदान : 12 टक्के
कंपनीकडून मासिक योगदान : 3.67 टक्के
EPF वर मिळणारा सध्याचा व्याजदर : 8.1 टक्के
पगारामध्ये दरवर्षी होणारी वाढ : 10 टक्के
निवृत्तीनंतर मिळणारा एकूण फंड : 2,40,72,613 रुपये
EPF मधील योगदान वाढवू शकता!
या योजनेवरील व्याजदराचा दरवर्षी आढावा घेतला जातो. याचा सर्वांत महत्त्वाचा फायदा हा आहे की, यावर मिळणारं व्याज हे चक्रवाढ व्याज (Compounding Interest) असल्याने दीर्घकालीन मुदतीवर याचा मोठा फायदा ग्राहकांना मिळतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाची सोय अशी आहे की, ग्राहक यामधील आपले योगदान वाढवू शकतात. कंपनीशी बोलून याबाबतचा निर्णय घेता येऊ शकतो. बऱ्याच कंपन्या Joining च्यावेळी हा पर्याय देतात.
PF वर व्याज कसे आकारले जाते?
PF खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला जमा होत असलेल्या पैशांवर व्याजदर आकारला जातो. पण तो वर्षाच्या शेवटी जमा केला जातो. EPFO च्या नियमानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेला म्हणजे साधारणत: 31 मार्चला PF खात्यामध्ये वर्षभर जमा झालेल्या रकमेवरील व्याज काढले जाते. यातून एखाद्या कर्मचाऱ्याने PF खात्यातून काही रक्कम काढली असेल तर ती वजा केली जाते. EPFO नेहमी खात्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलेन्स विचारात घेतात.
PF मध्ये जमा असलेली रक्कम नेमकी किती? तसेच निवृत्तीनंतर अंदाजे किती रक्कम मिळू शकते. याचा अंदाज तुम्ही PF Calculator च्या मदतीने काढू शकता. गुगलवर अशी अनेक पीएफ कॅलक्युलेटर आहेत; ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा पीएफ कॅलक्युलेट करू शकता.