Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5 Key Changes in PPF Account Rules : 'पीपीएफ' खात्याचे 5 महत्वाचे बदल, जे माहीत असायला हवेत

PPF, Changes in PPF, Interest of PPF

5 Key Changes in PPF Account Rules : आपल्या भविष्यकाळाचा विचार करून त्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात 'पीपीएफ'चा पर्याय सर्वांनाच माहित आहे. यात केंद्र सरकारने 2019 मध्ये काही बदल केले होते. पीपीएफ खाते काय असते आणि या खात्याविषयी काय नियम आहेत ते बघूया.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते हे  एक प्रकारचे  दीर्घकालीन बचत आणि गुंतवणूक यांचे मिश्रण असणारे एक खाते आहे. 1961 च्या प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत यामधून कर सवलत मिळते. तुम्ही तुमच्या PPF खात्यात वर्षाला 1 लाख 50 हजारपर्यंत गुंतवणूक करु शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. यातील ठेवी, जमा केलेला निधी, मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. 'पीपीएफ'साठी किमान गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षे आहे आणि यानंतरही  तुमच्या  खात्याची मुदत तुम्ही पाच पाच वर्षानी वाढवू शकता.

तुमचे पीपीएफ योजना खाते मॅच्युअर  झाल्यानंतरही पुढे चालू ठेवण्यासाठी फॉर्म-4 सबमिट करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मूळ ‘पीपीएफ’ खात्याच्या किंवा मुदतवाढ केल्यानंतर पीपीएफ  खात्याच्या मुच्युअर तारखेपासून एक वर्षाच्या आत हे करणे आवश्यक आहे. तुम्हाला यापुढे फॉर्म-H सबमिट करण्याची आवश्यकता नाही. शिवाय,  तुम्ही तुमचे पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यानंतर ते आणखी  ठेवी जमा न करताही ठेवू शकता आणि लागू असलेल्या पीपीएफ व्याजदरानुसार तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेवर व्याज घेत राहू शकता.

पूर्वी  पीपीएफ खात्यात एका आर्थिक वर्षात फक्त बारा वेळा पैसे जमा करणे शक्य होते.  मात्र, बदललेल्या नियमानुसार ठेवींच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. तुम्ही 50 च्या पटीत निधी जमा करू शकता. पण कमाल वार्षिक ठेवी मात्र नेहमीप्रमाणे 1 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाहीत. तसेच,  तुम्ही पूर्वीप्रमाणे अजूनही पीपीएफ  खात्यात वार्षिक किमान  500 रुपये जमा करणे आवश्यक आहे.

या नियमात बदल होण्यापूर्वी पीपीएफ खाते काही विशिष्ट परिस्थितीतच मुदतीपूर्वी बंद करता येत होते. उदा. खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनंतर उच्च शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय उपचारांसाठी पैशांची गरज भासल्यास मुदतीपूर्वी खाते बंद करता येत होते. मात्र बदल केलेल्या पीपीएफ खात्याच्या नियमांनुसार,  तुम्ही अनिवासी भारतीय झाल्यावरसुद्धा तुमचे खाते बंद करू शकता. याप्रमाणे खाते बंद करताना  तुम्हाला तुमच्या पासपोर्ट,  व्हिसा किंवा नविनतम (लेटेस्ट) आयकर रिटर्नची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

4. पीपीएफ कर्जावरील व्याज भरण्याविषयी (Interest Payment on Loans Against PPF)

केंद्र सरकारने पीपीएफ  खात्यातील ठेवींवरील कर्ज व्याज कमी केले आहे. पूर्वी, ज्या खातेदारांनी त्यांच्या पीपीएफ ठेवींवर कर्ज घेतले होते त्यांना प्रचलित पीपीएफ व्याजदरापेक्षा 2% व्याज दर वार्षिक भरावे लागत होते. मात्र, नवीन पीपीएफ  नियमांनुसार, सरकारने व्याज 2% वरून 1% पर्यंत कमी केले आहे.  त्यामुळे पीपीएफ  ठेवींवरील कर्जाची किंमत कमी झाली आहे.

5. कर्ज परतफेड अटीविषयी (Loan Repayment Terms)

नवीन पीपीएफ नियमानुसार, पीपीएफ  ठेवींवरील कर्जाची परतफेड 36 महिन्यांच्या आत केली पाहिजे.  कर्जाची अंशतः किंवा पूर्ण परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास वार्षिक 6% दराने आकारले जाणारे दंडात्मक व्याज भरावे लागेल.