Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बिटकॉईनसारख्याच आणखी काही महत्त्वाच्या क्रिप्टोकरन्सीज माहितीये तुम्हाला?

Important Cryptocurrency

बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी (Bitcoin Cryptocurrency) हे क्रिप्टोमार्केटमधील महत्त्वाचं कॉईन आहे. बिटकॉईनने अनेक गुंतवणूकदारांना मोठा नफा तसेच अनेकवेळा तोटा देखील दाखवला आहे. बिटकॉईनशिवाय इतर चांगल्या क्रिप्टोकरन्सीज कोणत्या आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? चला तर पाहुयात आणखी काही क्रिप्टोकरन्सीज्.

क्रिप्टोकरन्सी म्हटलं की बिटकॉईन (Bitcoin Cryptocurrency) हे नाव सर्वांनाच आठवतं. बिटकॉईनच्या प्रसिद्धीनंतर क्रिप्टोकरन्सी नक्की काय आहे? याची कल्पना लोकांना येऊ लागली. 2009 पासून मार्केटमध्ये असणाऱ्या बिटकॉईनचे आजचे बाजारातील भांडवल 364.81 बिलिअन डॉलर्स (Bitcoin Crypto Market capital) एवढे आहे. एका  बिटकॉईनची किंमत जवळ-जवळ 18,903.80 डॉलर्स म्हणजेच 15,32,825.02 रुपये एवढी आहे. बिटकॉईनची एवढी किंमत त्याला असलेल्या प्रसिद्धी आणि वाढत्या मागणीमुळे आहे. 

बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी हे क्रिप्टोमार्केटमधील महत्त्वाचं कॉईन आहे. बिटकॉईनने अनेक गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. पण अनेकवेळा तोटा देखील दाखवला आहे. बिटकॉईनला असलेल्या मोठ्या मागणीमुळे व अनेक गुंतवणूकदारांच्या बिटकॉईनमधील व्यवहारांमुळे बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी  मार्केटमधील सर्वात स्थिर कॉईन मानले जाते. कोणत्याही घटनेचा परिणाम जेवढा बिटकॉईनच्या किमतीवर होतो, तेवढा मोठा परिणाम इतर कॉईन्सवर होताना दिसत नाही. याचे उदाहरण म्हणजे जानेवारी, 2022 मध्ये झालेला क्रिप्टोकरन्सी क्रॅश (Cryptocurrency crash in January, 2022). यादरम्यान बिटकॉईनला व त्यातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. जवळ-जवळ 80 हजार गुंतवणूकदारांचे लक्षाधीश स्टेटस धुळीला मिळाले. अशा अस्थिर आणि मोठ्या क्रिप्टोकरन्सीला पर्याय काय? इतर क्रिप्टोकरन्सीजमध्ये बिटकॉईन एवढे संभाव्य आहे का? बिटकॉईनशिवाय इतर चांगल्या क्रिप्टोकरन्सीज कोणत्या आहेत? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग पाहुयात बिटकॉईननंतर 7 महत्वाच्या क्रिप्टोकरन्सीज कोणत्या आहेत?

इथेरिअम (Etherium)

बिटकॉईन नंतरची पहिली महत्त्वाची क्रिप्टोकरन्सी म्हणजे अर्थातच इथेरिअम. इथेरिअम हे एका विकेंद्रित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे; जे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि विकेंद्रित अॅप्लिकेशन्स (dApps) कोणत्याही डाउनटाइम, फसवणूक, नियंत्रण किंवा तृतीय पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय तयार आणि चालवण्यास मदत करतात. इथेरिअमवरील अॅप्लिकेशन्स इथरवर (Ether) चालतात. इथर हे इथेरिअमचे क्रिप्टोकरन्सी टोकन आहे. 2015 मध्ये लॉन्च केलेल्या इथेरिअमचे यशस्वी विलीनीकरण 15 सप्टेंबर रोजी पार पडले. 

इथेर ही क्रिप्टो बाजारातील बिटकॉईन नंतरची दुसरी मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉईनच्या बाजारातील भांडवलात आणि इथेरच्या भांडवलात जरी मोठा फरक असला तरी गुंतवणूकदार बिटकॉईननंतर इथेरचीच निवड करतात. एका इथेरची किंमत सध्या 1,383 डॉलर्स आहे म्हणजेच 1,06,336.71 भारतीय रुपये आहे.

टेथर (Tether)

टेथर ही सर्वात पहिली व सर्वात प्रसिद्ध स्टेबलकॉईन क्रिप्टोकरन्सी आहे. मोठ्या क्रिप्टोकरन्सीज जसे री बिटकॉईननी अनेकवेळा मोठी अस्थिरता अनुभवली आहे. अशावेळी टेथर सारखे कॉईन किमतीतील चढउतार टाळण्याचा प्रयत्न करतात. क्रिप्टो बाजारात टेथरचा जगात तिसरा क्रमांक लागतो. एका टेथर टोकनची किंमत 1.00 डॉलर म्हणजेच 80 ते 81 रुपये यादरम्यान आहे. 

युएसडी कॉईन (USD Coin) 

युएसडी कॉईन हे देखील एका स्टेबलकॉईन आहे. 2018 मध्ये लॉन्च झालेल्या या स्टेबलकॉईनमध्ये सर्कल आणि कॉईनबेस यांचा समावेश आहे. सर्कल हे युएस (US)वर आधारित असल्याने यावर नियम लागू होतात. युएसडी कॉईनचे आजचे बाजारातील भांडवल 55.5 बिलियन डॉलर आहे. एका युएसडी कॉईनची किंमत 1.00 डॉलर म्हणजेच 80 ते 81 रुपये आहे.

बायनान्स कॉईन (Binance Coin)

बायनान्स कॉईन ही एक युटिलिटी क्रिप्टोकरन्सी आहे. जी बायनान्स  एक्सचेंजवर होणाऱ्या व्यवहारांसाठी पेमेंट पद्धत म्हणून वापरली जाते. बायनान्स कॉईन बाजार भांडवलीकरणामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. बायनान्स कॉईन सुरुवातीला ERC-20 टोकन होते. जे इथेरिअम  ब्लॉकचेनवर चालायचे. बायनान्स कॉईन प्रूफ-ऑफ-स्टेक नेटवर्कचा वापर करते. बायनान्स कॉईनचे बाजारातील भांडवल 44.1 बिलियन डॉलर्स आहे व एका बायनान्स कॉईनची किंमत 273.68 डॉलर्स आहे. भारतीय रुपयांत त्याची किंमत 22,179.51 रुपये आहे. 

एक्सआरपी (XRP)

एक्सआरपी हे एक्सआरपी लेजरसाठी तयार केलेले मूळ टोकन आहे. एक्सआरपी प्रूफ-ऑफ-वर्क किंवा प्रूफ-ऑफ-स्टेक यांपैकी कोणत्याही नेटवर्कचा वापर करत नाही. एक्सआरपीचे बाजारातील भांडवल 19.6 बिलियन डॉलर्स एवढे आहे. एका एक्सआरपीची किंमत 0.4956 डॉलर्स म्हणजेच 40.17 रुपये आहे.

कार्डोना (Cardona)

कार्डोना ही एक औरोबोरोस प्रूफ-ऑफ-स्टेक (Oroboros Proof-of-stake) क्रिप्टोकरन्सी आहे. जी तयार करताना अनेक इंजिनियर्स, गणितज्ज्ञ आणि क्रिप्टोग्राफी तज्ज्ञांनी संशोधन केले होते. कार्डोनाचे सहसंस्थापक चार्ल्स हॉस्किन्सन आहेत; जे इथेरिअमचे सहसंस्थापक देखील आहेत. इथेरिअममधील वादांमुळे त्यांनी इथेरिअम सोडून कार्डोनाची निर्मिती केली. 

कार्डोनाचे बाजारातील भांडवल 15.9 बिलियन डॉलर्स एवढे असून ती जगातील 8व्या क्रमांकावरील मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. एका कार्डोनाची किंमत 0.47 डॉलर्स म्हणजेच 38.09 रुपये आहे.

सोलाना (Solana)

2017 मध्ये लॉन्च झालेली सोलाना क्रिप्टोकरन्सी एक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे. सोलानाला ‘इथेरिअम किलर’ असे देखील म्हटले जाते. सोलानाच्या निर्मितीपासूनच त्याच्या किमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळाली. सोलानाचे बाजारातील भांडवल 11.5 बिलियन डॉलर्स आहे. एका सोलानाची किंमत 31.98 डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत 2592.03 रुपये आहे.