एलिफंट मनी डीफाय प्लॅटफॉर्मवरून हॅकर्सनी सुमारे 11.2 दशलक्ष किमतीचे बायनान्स कॉईन चोरीला गेले आहेत. गेले कित्येक दिवसांपासून कंपनीला सायबर हल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यात हल्लेखोरांनी अखेरीस 11.2 दशलक्ष किमतीचे बायनान्स कॉईन चोरले, अशी माहिती एलिफंट मनीने दिली आहे. या कॉईन चोरी प्रकरणाचा ब्लॉकचेन सुरक्षा कंपनी सर्टीक (CertiK) आणि डीफाय इन्श्युरन्स प्रोटोकॉल इन्शुरएक (DeFi insurance protocol InsurAce) या दोन कंपन्या एकत्रितरीत्या तपास करत आहेत.
एलिफंट मनी खरेदी कसे करायचे?
एलिफंट मनी ही एक क्रिप्टो करन्सी आहे. काही क्रिप्टो करन्सी मिळवणं खूपच कठीण असते. एलिफंट मनी ही त्यापैकीच एक आहे. हे कॉईनबेस अॅप (Coinbase App) किंवा कॉईनबेस वॉलेटवर (Coinbase Wallet) उपलब्ध नाही. पण आम्ही तुम्हाला एलिफंट मनी (Elephant Money) खरेदी करण्याचा मार्ग शोधण्यात मदत करणार आहोत.
प्रत्येक क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यासाठी CoinMarketCap वर खरेदी करण्याच्या पर्यायांसह यादी दिलेली आहे. तर तुम्ही CoinMarketCap वर जाऊन एलिफंट मनी शोधून त्याची खरेदी करू शकता. एलिफंट मनी तुम्ही कोणत्या करन्सीमधून खरेदी करणार आहात. त्याची जोडी निवडून खरेदी करून शकता. जर तुम्हाला यूएस डॉलरने (US Dollor) एलिफंट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला एलिफंट/युएस डॉलर (ELEPHANT/USD) असे शोधावे लागेल.
एलिफंट टोकन (ELEPHANT Token) म्हणजे काय?
एलिफंट टोकन ही कॅरोलिना कॉलनीच्या सुरुवातीच्या काळात मोजक्या संख्येत तयार केलेली अनोखी नाणी होती. साधारणपणे, सतराव्या शतकात इंग्लंडमधील व्यापार्यांनी तयार केलेल्या कोणत्याही व्यापारी टोकनपेक्षा कॅरोलिना एलिफंट टोकन हे अधिक कुशलतेने तयार केलेले आणि वजनाने जड होते. आता ते नव्याने एलिफंट मनी या नावाने क्रिप्टो करन्सी म्हणून आले आहे.